शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

महसूल उद्दिष्टाचे आव्हान

By admin | Updated: October 29, 2014 00:14 IST

शिरोळ तहसील : वाळू लिलावातून उत्पन्न वाढीसाठी होणार प्रयत्न

संदीप बावचे- जयसिंगपूर -गौण खनिज विभागाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शिरोळ महसूल विभागाला यंदाही वाळू लिलावाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. वाळू, मुरुम, माती व दगड यातून सुमारे दहा कोटी रुपयांचे उद्दिष्ट महसूल प्रशासनासमोर आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामानंतर आता महसूल उद्दिष्टाचे आव्हान त्यांच्या समोर आहे.महसूल असो अथवा मुद्रांक शुल्क सर्वाधिक महसुलाचे उत्पन्न मिळवून देणारा तालुका म्हणून शिरोळ तालुका जिल्ह्यात ओळखला जातो. एकेकाळी दीड कोटी रुपयांचे साधारण उत्पन्न असणाऱ्या या तालुक्यात आता वाळू लिलाव नऊ कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचला आहे. तालुक्यात चाळीसहून अधिक मजूर संस्था कार्यरत आहेत. शिवाय माती, मुरुम आणि वाळू लिलावातून महसूल मोठ्या प्रमाणात मिळतो. गतवर्षीही वाळू, माती, मुरुम व दगड यातून नऊ कोटी रुपयांचे उद्दिष्ट तहसील कार्यालयाला होते. केवळ शिरोळ तालुक्यातील वाळू लिलावातूनच नऊ कोटींचा महसूल प्रशासनाला मिळाला. यंदा दहा कोटी रुपयांचे गौण खनिज महसुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तालुक्यातील ८० हून अधिक वाळूचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे गेले आहेत. प्रशासकीय पातळीवर वाळूचे लिलाव लांबणीवर न पाडता लवकर करून घेण्याची शक्यता आहे. गतवर्षी वाळू लिलावातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला, तर ठेकेदारांचीही चांदी झाली. सप्टेंबरची मुदत मिळाल्यामुळे ठेकेदारांनी पुरेपूर फायदा उचलला. पावसाळ्यानंतर सप्टेंबर अखेरचे दहा ते बारा दिवस वाळू उपसा झाला. गौण खनिजांतून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्यामुळे महसूल प्रशासन उद्दिष्ट पार करण्यासाठी वाळू लिलावाची वाट पाहत आहे. एकूणच विधानसभा निवडणुकीच्या कामानंतर तहसील प्रशासनाला आता महसूल उद्दिष्टाचे आव्हान आहे.शिरोळ तालुक्यात गेल्या हंगामात मोठ्या प्रमाणात वाळू तस्कारांनी उच्छाद मांडला होता. तालुक्यात पन्नासहून अधिक बेकायदा वाळूचे प्लॉट तहसीलदार सचिन गिरी यांच्या पथकाने उद्ध्वस्त केले होते. आतापर्यंतची सर्वाधिक मोठी कामगिरी गिरी यांनी बजावली. गेल्या आठवड्यात लिलाव होण्यापूर्वीच राजापूर येथे बेकायदा वाळू उपसा सुरू झाला होता. तो महसूल विभागाने बंद पाडला असला, तरी येणाऱ्या वाळू हंगामात बेकायदा वाळू उपशाचे मोठे आव्हान ‘महसूल’समोर असणार आहे.