शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
2
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
3
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
4
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
5
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
6
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
7
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
8
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
9
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
10
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
11
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
12
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
13
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण
14
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
15
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
16
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
19
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
20
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला

विजयाची हंडी फोडण्याचे दिलीप पाटील यांच्यासमोर आव्हान

By admin | Updated: April 13, 2015 00:36 IST

उमेदवारी देताना संघातील त्याग, कर्तृत्वापेक्षा नेत्यांच्या हुजरेगिरीला महत्त्व देऊन स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी कोण उपयुक्त ठरतो, याचाच विचार करून

गणपती कोळी - कुरुंदवाड- कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)ची हंडी पुन्हा शिरोळमध्येच राखण्यात दिलीप पाटील यशस्वी झाले आहेत. हातकणंगलेला पुन्हा मिळालेली हुलकावणी, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी घेतलेली भूमिका व विरोधकांनी घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे पाटील यांना हंडी फोडण्यास मोठी कसरत करावी लागणार आहे.विधानसभेची उमेदवारी नसली तरी चालेल मात्र, गोकुळचे संचालकपद मिळावे, असे म्हटले जाते. त्यासाठी इच्छुकांची उमेदवारी मिळविण्यासाठी तर विद्यमानांची उमेदवारी टिकविण्यासाठी धडपड सुरू असते. गोकुळचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनीही उमेदवारी देताना संघातील त्याग, कर्तृत्वापेक्षा नेत्यांच्या हुजरेगिरीला महत्त्व देऊन स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी कोण उपयुक्त ठरतो, याचाच विचार करून उमेदवारी दिली जाते.गोकुळमध्ये नेत्यांचीही भागिदारी आहे. १९९८ मध्ये तत्कालीन खासदार बाळासाहेब माने यांच्या कोट्यातून हातकणंगले तालुक्यातून अरुण इंगवले यांना उमेदवारी मिळाली होती. हातकणंगलेमध्ये ७६, तर शिरोळमध्ये ११७ सभासद आहेत. त्यामुळे दोन तालुक्यांना मिळून एक उमेदवार दिला जातो. २००३च्या निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांनी दिलीप पाटील यांच्या रूपाने शिरोळला संधी दिली. २००८ मध्ये हातकणंगले तालुक्याच्या उमेदवारीसाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले, मात्र त्यावेळीही आप्पांची कृपादृष्टी पुन्हा शिरोळच्या पाटलांवरच पडली.पाटील यांची शेवटचीच संधी असे मानले जात असताना राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पृथ्वीराज चव्हाण आले. त्यांचे व पाटील यांचे निकटचे संबंध असल्याने पाटील यांचे गोकुळमध्ये वजन वाढून अचानक ते अध्यक्षपदाच्या शर्यतीत आले. आप्पांची मर्जी अन् बाबांची कृपा यातून शेवट टर्मला अध्यक्षपदाची संधी मिळाली. नवीन सहकार धोरण, लोकसभा, विधानसभा निवडणुकीमुळे पंचवार्षिक कालावधी वाढून मिळाला. तालुक्यातून स्वाभिमानी दुधाच्या कडव्या स्पर्धेतही संकलन वाढवून पाटील यांनी आपले कर्तृत्वही सिद्ध करून दाखविले अन् राजकीय सत्तासंघर्षातही पुन्हा आपली उमेदवारी टिकून गोकुळची हंडी तालुक्यात राखण्यात यशस्वी झाले.कोल्हापुरात महाडिक व सतेज पाटील यांचा पेटलेला संघर्ष यातून विरोधकांची आक्रमक भूमिका, त्यातच विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीविरोधात घेतलेली भूमिका. हातकणंगले तालुक्याच्या पदरी आलेली पुन्हा निराशा त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे तालुक्यात गोकुळची हंडी मिळाली असली तरी फोडण्यासाठी ती आव्हानात्मक ठरणार आहे.हातकणंगलेवासीयांतील बेकी पाटलांच्या पथ्यावरपाटील यांच्या दुसऱ्या टर्मलाच हातकणंगलेला संधी मिळावी यासाठी प्रयत्न झाले; मात्र हातकणंगलेमध्ये इच्छुकांत एकमत न झाल्याने पाटील यांना पुन्हा संधी मिळाली. यावेळी त्यांचा पत्ता कट होणार व अमल महाडिक यांच्या रूपातून हातकणंगलेला संधी मिळणार हे निश्चित मानले जात होते. परंतु राज्याच्या मुख्यमंत्रिपदी चव्हाण आल्याने पाटील यांचे गोकुळमधील राजकीय वजन वाढून अध्यक्षपदापर्यंत पोहोचले. त्यातच विधानसभा निवडणुकीत महाडिकांचा विजयही पाटील यांच्या पथ्यावर पडला. उमेदवार निवडीत अध्यक्षाला वगळणे नैतिकदृष्ट्या शेवटच्या टर्मला मिळालेले अध्यक्षपदही लाभदायक ठरले. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला नशिबाने साथ दिल्याने गोकुळमधील आपले अस्तित्व टिकविण्यात यशस्वी ठरले.