शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक काळात कोरोनाचे नियम पाळण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST

संदीप बावचे शिरोळ : ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानादिवशी खबरदारी घेण्यासाठी निवडणूक आयोगाने गाईडलाईन दिली आहे. मतदान केंद्रांवरील रांगा, केंद्रावर ...

संदीप बावचे

शिरोळ : ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानादिवशी खबरदारी घेण्यासाठी निवडणूक आयोगाने गाईडलाईन दिली आहे. मतदान केंद्रांवरील रांगा, केंद्रावर बुथ अ‍ॅपचा वापर, मतदारांसाठी सॅनिटायझर, साबण अशी व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणेकडून नियोजन सुरू असले तरी यंत्रणेची चांगलीच कसरत होणार आहे. नागरिकांशी थेट संबंध येणारी ग्रामपंचायत निवडणूक शासकीय यंत्रणेसमोर आव्हान ठरणारी आहे. कोरोनाचे नियम पाळून निवडणूक काळात प्रचार करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांवर अनेक बंधने आली आहेत. प्रचारासाठी पाचपेक्षा अधिक लोकांना परवानगी नसल्याने प्रचारावरही मर्यादा आली आहे. निवडणूक काळात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, यासाठी निवडणूक अधिकारी, कर्मचारी याबरोबरच मतदार व उमेदवारांनाही कोरोनाचे नियम पाळावे लागणार आहेत.

-----------------

नोटाचेही बटण दाबता येणार

लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणुकीतसुद्धा मतदारांना मतपत्रिकेवरील एकाही उमेदवाराला मतदान करावयाचे नसल्यास नोटाचे बटण दाबता येणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर नोटा हा पर्याय उपलब्ध असल्यामुळे ज्या मतदारांना कोणत्याही उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा नाही त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

आरोग्य यंत्रणेची तयारी

प्रत्येक मतदान केंद्रावर एक ते दोन आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. तपासणीसाठी थर्मल टेस्टिंग, ऑक्सिमीटर अशी यंत्रणा सज्ज ठेवली जाणार आहे. कोविडची लक्षणे दिसून आल्यास त्या मतदाराला तत्काळ स्वॅब तपासणीसाठी कोविड केंद्रावर पाठविले जाणार आहे. मतदानासाठी आरोग्य यंत्रणेने तयारी केली आहे.

शिरोळमध्ये २४५ मतदान केंद्रे

तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी २४५ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी १२८० कर्मचाऱ्यांच्या ३२० पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान यंत्रेही तालुका प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहेत. संवेदनशील केंद्रांवर पोलीस यंत्रणेची करडी नजर राहणार आहे.