शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शियेत शिवसेनेचा वारू रोखण्याचे आव्हान

By admin | Updated: January 9, 2017 00:19 IST

निगवे ‘गणा’त भाऊगर्दी : बहुरंगी लढती झाल्या तरी ‘अंडर करंट’चे झटके बसण्याची शक्यता

विश्वास चरणकर ल्ल कोल्हापूर‘मिनी विधानसभा’ अर्थात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्यास काहीच दिवस शिल्लक असल्याने शिये मतदारसंघात वातावरण हळूहळू तापत चालले आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात आता शिवसेनेने आपली पकड घट्ट केली आहे. विधानसभेची पूर्वतयारी म्हणून काँग्रेस पुन्हा आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करेल, तर शिवसेना आपली पकड अधिक घट्ट करण्याच्या तयारीत असेल. तर राष्ट्रवादी गेल्यावेळच्या पराभवाचे उट्टे काढण्याचा प्रयत्न करेल. शिये जिल्हा परिषद मतदार संघ यावेळी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. येथे गेल्या वेळी शिवसेनेच्या बाजीराव पाटील (नाना) यांनी बाजी मारली होती. राष्ट्रवादीच्या प्रदीप पाटील-भुयेकर यांनी चांगली झुंज दिली होती. बाजीराव पाटील यांनी पाच वर्षांत स्वत:च्या आणि आमदार चंद्रदीप नरके व त्यांच्या विविध फंडातून मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्याशिवाय पाटील यांचा वैयक्तिक जनसंपर्क चांगला असून, तरुण शिवसैनिकांची चांगली फळी हाताशी आहे. त्यामुळे शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. पण गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या साथीला असलेला भाजप यावेळी स्वतंत्र लढणार असल्याने त्यांची ताकत थोडी कमी होणार आहे. गेल्या जि. प. निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर घसरला होता. काँग्रेसची ताकद पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक या तिघांमध्ये विभागली गेली असल्याने आणि जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वमान्य प्रभावी नेतृत्त्व नसल्याने पक्षाला ‘बुरे दिन’ आले आहेत. पी. एन. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत या कार्यकर्त्यांना ‘चार्ज’ केले होते. तरीही येथे पक्षाला बहुमत मिळाले नाही. पक्षाची उमेदवारी कोणत्या गटाला मिळणार, यावर तिन्ही गटाची रणनीती ठरणार आहे.राज्याचे माजी आरोग्यमंत्री स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांच्या काळात येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचंड प्राबल्य होते. त्यांच्या निधनाने त्यांचे जुने जाणते कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाच्या आश्रयाला गेले आहेत. काही निष्ठावान कार्यकर्ते याला अपवाद आहेत. या पक्षाची धुरा आता प्रदीप पाटील-भुयेकर या युवा नेतृत्त्वाच्या खांद्यावर आहे. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. यंदा पं. स. साठी शिये गणातून त्यांच्या मातोश्री मालिनी पाटील रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे त्यांची आणि पक्षाची प्रतिष्ठा पुन्हा पणाला लागली आहे. भाजपची ताकत येथे मर्यादित असली तरी, जनसुराज्यशक्ती पक्ष आणि ताराराणी आघाडी हे एकत्र आल्यास त्यांना संधी मिळू शकते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अजून पत्ते खोललेले नाहीत. निगवे दुमाला पंचायत समिती मतदार संघ खुला झाल्याने येथे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. पं. सं.चा शिये गण ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. येथे सेनेच्या सागर शिंदे, उदय सुतार आणि कृष्णात पोवार या तीन निष्ठावान कार्यकर्त्यांनी आपल्या सौभाग्यवतींसाठी तिकीट मागितल्याने पक्षनेतृत्त्वाची येथे कसोटी लागणार आहे. या निवडणुकीत बहुरंगी लढतीचे चित्र असले तरी पक्षापलीकडे जावून काही ठिकाणी शह काटशहाचे राजकारण रंगणार आहे. हे अंडर करंट कोणाला तारणार, कोणाला मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.इच्छुक उमेदवार$$्रिजिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून मनिषा सतीश कुरणे (शिये), राष्ट्रवादी कॉग्रेसकडून वैशाली पांडुरंग कांबळे (शिये), राष्ट्रीय कॉग्रेसकडून कु. रोहिणी बाबासो कामत-कांबळे (शिये), प्रियांका सागर कांबळे, सुनंदा देवानंद चोपडे (निगवे दुमाला), राणी मारुती पोवार (केर्ले), ताराराणी आघाडीकडून सुप्रिया दत्तात्रय मोरे (शिये), तर जनसुराज्यकडून शियेतील मंगल अनिल कांबळे हे उमेदवार इच्छुक आहेत. डॉ. सुषमा विलास सातपुते आणि मंगल कृष्णात चौगले (निगवे दु.) या इच्छुकांनी अद्याप पक्ष निश्चित केलेला नाही.शिये पंचायत समितीसाठी शिवसेनेकडून रुपाली उदय सुतार, शारदा कृष्णात पोवार (भुयेवाडी), नयना सागर शिंदे (शिये), राष्ट्रीय काँग्रेसकडून नंदाताई विलास गुरव (शिये), प्रियांका सचिन चौगले (भुयेवाडी), राष्ट्रवादी कॉग्रेसकडून मालिनी दादासो पाटील-भुयेकर, भाजपकडून संजीवनी बुवा, जनसुराज्यकडून मिनाक्षी जयसिंग लोखंडे (शिये) हे इच्छुक आहेत.निगवे दुमाला पंचायत समितीसाठी शिवसेनेकडून सुरेश पाटील, अर्जुन पाटील, कृष्णात जासूद, दिलीप यादव (निगवे दुमाला), चंद्रकांत पाटील, सागर शिर्के (केर्ले), भीमराव पाटील (केर्ली), राष्ट्रीय काँग्रेसकडून प्रकाश पाटील, पंडित लाड, सागर राजेंद्र पाटील, बाजीराव लाड (निगवे दुमाला), सचिन चौगले (केर्ली), सचिन माने (केर्ले) राष्ट्रवादीकडून विश्वनाथ पोवार (केर्ली), भाजपकडून विक्रम माने, संदीप व्हरांबळे (केर्ली), अजिंक्य माळी, संजय कदम (निगवे दुमाला), तर ’स्वाभिमानी’कडून बाळासाहेब रानगे (निगवे दुमाला) हे प्रमुख इच्छुक आहेत.गावे : शिये, भुये, भुयेवाडी, जठारवाडी, सादळे-मादळे, निगवे, केर्ली, केर्ले, रजपूतवाडी, सोनतळी, पडवळवाडी, प्र. चिखली.(एक प्रभाग)