शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेतही चलन घोटाळा

By admin | Updated: November 19, 2016 01:06 IST

कुणी तरी एक शक्कल लढविली. जिल्हा परिषदेचा सर्व व्यवहार कॅनरा बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेत आहे

कोल्हापूर : देशभर नोटा रद्द करण्याचा आणि बदलून घेण्याचा घोळ सुरू असताना शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा परिषदेतही वेगळाच चलन घोटाळा उघडकीस आला. यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली.केंद्र सरकारने मोठ्या रकमेच्या नोटा रद्द केल्यामुळे बँकांत सर्वत्र गर्दी आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांकडेही असलेल्या पाचशे व हजारांच्या नोटा बदलून घ्यायच्या होत्या. परंतु, त्यांना बँकेत जाऊन रांगेत थांबणे शक्य नसल्याने कुणी तरी एक शक्कल लढविली. जिल्हा परिषदेचा सर्व व्यवहार कॅनरा बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेत आहे. या बँकेशी संपर्क साधून जिल्हा परिषदेमध्ये नोटा बदलून देण्याचे आऊटलेट सुरू करावे, असे बँकेला सुचविले. त्यानुसार बँकेने आपला एक अधिकारी देऊन जिल्हा परिषदेत सुविधा सुरू केली. परंतु, बँकांतील गर्दी वाढल्यानंतर त्या अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेत येणे शक्य झाले नाही. त्यामुळे ज्यांच्या नोटा बदलायच्या आहेत, त्यांनी त्यांचे आधार व पॅनकार्ड झेरॉक्स आणि नोटांचे नंबर लिहून बँकेत पाठवावेत, असे सांगण्यात आले. त्यानुसार १६० कर्मचारी व अधिकाऱ्यांचे प्रत्येकी चार हजार रुपयांप्रमाणे पैसे गोळा करण्यात आले व बँकेत नोटा बदलण्यासाठी जिल्हा परिषदेचा कर्मचारी गेला. परंतु, गर्दी असल्याने बँकेतून फक्त ४० लोकांचेच पैसे बदलून मिळाले. हे पैसे मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी हे पैसे आपापसांत वाटून घेतले.आपल्या पैशाचे काय झाले, म्हणून कर्मचाऱ्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली तर त्या कर्मचाऱ्यांचे पैसे बदलून नेले असल्याचे उघडकीस आले. कुणाचे पैसे बदलून मिळाले, हे समजले नसल्याने जे पैसे मिळाले ते अधिकाऱ्यांनी आपापसांत वाटून घेतले. कर्मचाऱ्यांनी याबद्दल विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यासंदर्भात पत्रकारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांना विचारणा केली. त्यांनी या घटनेस दुजोरा दिला. आपणासही दोन हजार मिळाले असून, कागदपत्रांचा गैरवापर झाला आहे का? याची चौकशी करावी लागेल, असे उत्तर त्यांनी दिले.पैसे एकाचे आणि खिशात घातले दुसऱ्याने या ‘आयजीच्या जिवावर बायजी उधार’ प्रवृत्तीची जिल्हा परिषदेत जोरदार चर्चा रंगली.