शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

गांधीनगरात मटक्याच्या वादातून चाकूहल्ला

By admin | Updated: August 17, 2014 00:53 IST

एकजण गंभीर : तलवारीनेही वार; भर बाजारपेठेतील घटनेने व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण

वसगडे : मटका घेण्याच्या वादातून गांधीनगर (ता. करवीर) येथे एकावर चाकूसह तलवारीने प्राणघातक हल्ला करण्याची घटना आज, शनिवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. गोपाळ बलराम राजपूत (वय ४०, रा. गांधीनगर) असे जखमीचे नाव आहे. घटनेची नोंद गांधीनगर पोलिसांत झाली आहे. भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गोपाळ राजपूत हा गांधीनगर येथील एका बारमध्ये मटका घेत होता, तर गणेश शेळके हा फिरून मटका घेत असे. मटक्याच्या वादातून महिन्याभरापूर्वी या दोघांमध्ये जोराचा वाद झाल्याचे समजते. आज रात्री साडेनऊच्या सुमारास गोपाळ व त्याचा मित्र नारुमल दिवाणजी हे दोघे बारजवळील कैलाश चिकनवाला या गाड्यावर थांबले होते. त्यावेळी गणेश शेळके हा दुचाकीवरून तेथे आला व त्याने गोपाळला, तू माझ्या धंद्यामध्ये का आडवा येतोस? असे विचारत त्याच्याशी वाद केला. त्याने चाकूने गोपाळच्या हातावर वार घातला. त्यामुळे गोपाळ तेथून पळून जात असता त्याचा पाय घसरल्याने तो खाली पडला. त्याचवेळी गणेशने त्याच्यावर तलवारीने पाठीत व डोक्यात वार केले.गणेशने नारुमल याच्यावरही तलवार हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण तो पळत सुटल्याने बचावला. भर बाजारपेठेत अचानक झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, गोपाळवर तलवारहल्ला झाल्याची माहिती त्याचा भाऊ मुकेशला कळाल्याने त्याने घटनास्थळी धाव घेतली. त्याने गोपाळला गांधीनगर वसाहत रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला सीपीआरला हलवण्यात आले. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)