शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाच्या पटलावर अध्यक्षपदाचे चेकमेट

By admin | Updated: October 29, 2014 00:13 IST

नियोजित अध्यक्षांवर अन्याय : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

इंदूमती गणेश - कोल्हापूर -अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या न्यायालयीन फेऱ्यांमुळे ‘तेलही गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे आले’ अशी अवस्था नियोजित अध्यक्षांसह सदस्यांची झाली आहे. पदमुक्त झालेल्या अध्यक्षांचा कालावधी संपून दोन महिने उलटून गेले तरी या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. महामंडळातील राजकारणातून एकमेकांना चेकमेट करण्याच्या नादात कामकाज ठप्प झाले आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्याविरोधात विनयभंगाची खोटी तक्रार केलेल्या सदस्यांवर कारवाई करण्यात कुचराई केल्याने कार्यकारिणीतील संचालकांनी ४ आॅगस्टला झालेल्या बैठकीत महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव करून त्यांना पदमुक्त केले होते. खरे तर त्यानंतर कोंडके यांची अध्यक्षपदाची मुदत २७ आॅगस्टला म्हणजे अवघ्या पंधरा दिवसांत संपणार होती. मात्र, सुरुवातीच्या काळात ठरवून कार्यकारिणीला ‘सळो की पळो’ करून सोडणाऱ्या विरोधकांना ‘जशास तसे’ उत्तर देण्याची हीच वेळ होती. विनयभंगाच्या तक्रारीमुळे सदस्यांनाही चित्रपटसृष्टीची शिखरसंस्था असलेल्या महामंडळाची झालेली बदनामी जिव्हारी लागली होती. ‘पेराल ते उगवेल’ या उक्तीप्रमाणे पूर्वीच्या अध्यक्षांसारखेच परिणाम कोंडके यांनाही भोगावे लागले. मात्र, कोंडके यांनी या अविश्वास ठरावाविरोधात जिल्हा न्यायालयात दाद मागितली आहे. गेले दोन महिने न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दरम्यान, महामंडळाने जिल्हा न्यायालयाला हा खटला चालविण्याचा अधिकार नसल्याचा दावा केला होता, तो न्यायालयाने फेटाळून लावला आहे. मात्र, या सगळ्यांमुळे महामंडळाचे कामकाज ठप्प झाले आहे. नियोजित अध्यक्षांवर अन्यायमाजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे पायउतार झाल्यानंतर विजय कोंडके आणि विजय पाटकर यांना एक-एक वर्षाचे अध्यक्षपद देण्याचा निर्णय कार्यकारिणीने घेतला होता. मात्र, कोंडके यांचे प्रकरण न्यायालयात गेल्याने कार्यकारिणीला नव्या अध्यक्षाची निवड करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पाटकर यांना मिळालेल्या एका वर्षातील दोन महिने आधीच निघून गेले आहे. अध्यक्षपदाची ही सुनावणी आणखी किती दिवस चालेल, त्याचा निकाल कधी लागणार, हे सांगता येत नाही. दहा महिन्यांनंतर थेट महामंडळाच्या निवडणुकाच लागतील. या प्रकरणात पाटकरांचे अध्यक्षपद मात्र अजून दूर गेले आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत पॅनेल असले तरी निवडून आल्यानंतर सर्व सदस्य मिळून काम करायचे. मात्र, गेल्या चार वर्षांत महामंडळाचे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे कट्टर वैरी असल्यासारखे वागत आहे. अहंकारापोटी एकाने दुसऱ्यावर कुरघोडी केली की कधी संपणार विरोधाचेराजकारण?दुसरा दंड थोपटून तयार. समोरचा माणूस कधी चूक करून आपल्या जाळ्यात सापडतो आणि आपण कधी एकदा त्याचा वचपा काढतो, या भावनेतून केले जाणारे राजकारण कधी थांबणार, असा प्रश्न सर्वसामान्य चित्रपट व्यावसायिकांना पडला आहे. या प्रश्नांचे काय?एकमेकांशी भांडत बसलेल्या या कार्यकारिणी सदस्य आणि विरोधक सभासदांनी चित्रपटसृष्टीच्या प्रश्नांवर मात्र कधी ‘ब्र’ उच्चारलेला नाही. सुर्वे यांच्या काळात काही प्रमाणात विकासाच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी त्या लालफितीच्या कारभारात अडकल्याने आता हे श्रेय त्यांनी घेण्याचे काहीच कारण नाही. विद्यमान अध्यक्षांनी गेल्या वर्षभराच्या कालावधीत आपण अमूक एवढी कामे केली, असे ते सांगत असले तरी त्यांची तांत्रिक पूर्तता यापूर्वीच झाली होती. त्यामुळे त्यांनी काय विकासकामे केली हे त्यांचे त्यांनाच माहीत. कोल्हापूर चित्रनगरीचा रखडलेला विकास, कलाकारांचे मानधन, मराठी चित्रपट व्यावसायिकांचे प्रश्न, तंत्रज्ञ-कामगारांचे प्रश्न यांच्या सोडवणुकीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे.