शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सीईटीचे ‘गणित’ होते अवघड

By admin | Updated: May 6, 2016 01:10 IST

परीक्षा सुरळीत पार : १३ हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

कोल्हापूर : आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदाची सामायिक प्रवेश परीक्षा (एमएच-सीईटी) गुरुवारी झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील १३ हजार ९७४ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ही परीक्षा दिली. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचा पेपर सोपा; पण गणिताचा पेपर जरा अवघड होता, अशा प्रतिक्रिया पेपरनंतर विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. ही परीक्षा शांततेत पार पडली.राज्याच्या सामायिक परीक्षा विभागातर्फे ‘एमएच-सीईटी’ परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील १४ हजार २७९ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नोंदणी केली होती. शहरातील प्रायव्हेट हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल, उषाराजे हायस्कूल, डी. एड्. कॉलेज, कमला कॉलेज, विवेकानंद ज्युनिअर व सीनिअर कॉलेज, न्यू मॉडेल स्कूलची एक व दोन क्रमांकाची इमारत, शहाजी कॉलेज, महावीर महाविद्यालय, आदी ३४ केंद्रांवर गुरुवारी परीक्षा झाली. सकाळी नऊ वाजल्यापासून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी आणि पालकांनी गर्दी केली. परीक्षेपूर्वी बैठक व्यवस्था पाहण्यासाठी धावपळ उडाली. सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचा पहिला पेपर झाला. यानंतर दुपारी साडेबारा ते दीड या वेळेत जीवशास्त्राचा पेपर झाला. त्यानंतर तिसरा गणित या विषयाचा पेपर दुपारी तीन ते साडेचार या वेळेत झाला. बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित हे पेपर होते. यातील पहिला आणि दुसरा पेपर सोपा; पण गणिताचा पेपर जरा अवघड असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त होता. जिल्हा प्रशासनाचे ११०० अधिकारी, कर्मचारी परीक्षेच्या नियोजनात कार्यरत होते. (प्रतिनिधी) अवधूत पाटीलची संधी हुकली; सीईटीला मुकलादेऊळवाडी (ता. भुदरगड) येथील अवधूत ईश्वरा पाटीलची वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली एम.एच.-सीईटी ही परीक्षा मणक्याच्या त्रासामुळे संधी हुकली. दरम्यान, गेल्या आठवड्यात राजारामपुरी, दुसऱ्या गल्लीतील एका इमारतीच्या जिन्यावरून पडून तो जखमी झाला होता. सध्या त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. अवधूत पाटील याला दोन आठवड्यांपूर्वी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दहा घरफोड्या व मोबाईल चोरीप्रकरणी कारवाई करून अटक केली होती. सध्या अवधूत पाटीलचा तपास राजारामपुरी पोलिस करीत आहेत. दुसऱ्या एका गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्याला राजारामपुरी पोलिस तपासासाठी घेऊन परत येत असताना जिन्यावरून तो खाली पडला. त्यामध्ये अवधूतच्या मणक्याला दणका बसला. त्याला सीपीआरमध्ये उपचारांसाठीदाखल केले आहे. पेपर नोंदणी केलेलेपरीक्षा दिलेलेपहिला पेपर१४२७९१३९७४दुसरा पेपर७५००७३०६ तिसरा पेपर१००९२९८५२