शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

सीईटीपी प्रकल्पाचे काम बंद पाडल

By admin | Updated: November 11, 2014 23:25 IST

तळंदगे ग्रामस्थ आक्रमक : जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले

हुपरी : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात आलेला सीईटीपी प्लॅन्ट वनटाईम मेंटनन्स (दुरुस्ती)च्या नावाखाली बंद ठेवून विविध कंपन्यांमधून येणाऱ्या रसायनमिश्रित प्रदूषित पाण्यावर कोणत्याही प्रकारची शुद्धीकरण प्रक्रिया न करता हे प्रदूषित पाणी तळंदगे (ता. हातकणंगले) गावाच्या ओढ्यामध्ये सोडण्यात आल्याने संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, ओढा परिसरातील पिके व गवत करपू लागले आहे. या घटनेने संतप्त ग्रामस्थांनी प्लॅन्टवर जाऊन याबाबतचा जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले व प्लॅन्ट दुरुस्तीचे काम बंद पाडले.दरम्यान, ग्रामपंचायतीने औद्योगिक विकास महामंडळापासून शासनाच्या सचिवापर्यंत सर्वांकडे याप्रश्नी पत्रव्यवहार करून गावाच्या आरोग्याच्या समस्या, धोके व अडचणी मांडल्या आहेत; परंतु ग्रामपंचायतीने सुचविलेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी करण्यामध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत गावाच्या झालेल्या आरोग्य व वित्तहानीस जबाबदार धरून औद्योगिक विकास महामंडळाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सरपंच मंगल वाघमोडे व उपसरपंच राजेंद्र हवालदार यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.वनटाईम मेंटनन्स व आॅपरेशन करण्याकरिता २१ आॅक्टोबरपासून पुण्याच्या थर्म्याक्स कंपनीने हा प्लॅन्ट ताब्यात घेतला आहे. दुरुस्तीचे काम करण्यासाठी वसाहतीतील विविध कंपन्यांमधून येणारे प्रदूषित पाणी पूर्णपणे थांबविणे गरजेचे आहे. मात्र, या मुर्दाड कंपन्या जाणीवपूर्वक प्रदूषित पाणी प्लॅन्टकडे पाठवून देत आहेत. त्यामुळे प्लॅन्टची दुरुस्ती करणे, तीव्र स्वरूपाच्या रसायनापासून तयार झालेले व याठिकाणी साठवलेले ‘स्लज’ काढणे, वाळविणे अशा प्रकारच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. तसेच चालू स्थितीत पंप व एअर बोअरचे मेंटनन्सही करता येत नाही. अशी वस्तुस्थिती झाल्याने विविध कंपन्यांतून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी ताबडतोब बंद करावे, अन्यथा प्लॅन्ट दुरुस्तीचे काम करणे आम्हास अशक्य आहे, असे पत्रक थर्म्याक्स कंपनीचे इन्चार्ज आर. एस. जाधव यांनी पंचतारांकित औद्योगिक सीईटीपी प्लॅन्टचे चेअरमन गुप्ता यांना देऊन दुरुस्तीचे कामही ग्रामस्थांच्या रुद्रावतारामुळे थांबविले.चार दिवसांपासून रसायनमिश्रित प्रदूषित पाणीतळंदगेचे ग्रामदैवत श्री जगन्नाथ देवाच्या यात्रा काळात सर्व ग्रामस्थ व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत गेल्या चार दिवसांपासून रसायनमिुश्रत प्रदूषित पाणी सरळसरळ गावाच्या ओढ्यात सोडण्यात येत होते. या प्रदूषित पाण्याची दुर्गंधीची तीव्रता गावापर्यंत पोहोचताच संतप्त झालेले उपसरपंच राजेंद्र हवालदार, सागर चौगुले, अविनाश भोजकर, तानाजी शिंदे आदींनी ग्रामस्थासह धाव घेऊन सीईटीपी प्लॅन्टवर जाऊन दुरुस्तीचे काम बंद पाडले. दुरुस्तीचा ठेका घेणाऱ्या थर्म्याक्स कंपनीच्या व औद्योगिक विकास महामंडळाच्या तसेच सीईटीपी को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले.