शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील सीईटीपीकडे दुर्गंधी प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित

By admin | Updated: May 10, 2014 20:28 IST

* साठ लाख रुपये खर्चाची फिल्टर प्रेस यंत्रणा सुरूइचलकरंजी : येथील कापडावर प्रक्रिया करणार्‍या कारखान्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या सीईटीपीमध्ये साठ लाख रुपये खर्चाच्या फिल्टर प्रेसची यंत्रणा नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर व प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी सूर्यकांत डोके यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. नवीन यंत्रणेमुळे सीईटीपीतून बाहेर पडणार्‍या स्लज दुर्गंधी विरहीत ...

* साठ लाख रुपये खर्चाची फिल्टर प्रेस यंत्रणा सुरूइचलकरंजी : येथील कापडावर प्रक्रिया करणार्‍या कारखान्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या सीईटीपीमध्ये साठ लाख रुपये खर्चाच्या फिल्टर प्रेसची यंत्रणा नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर व प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी सूर्यकांत डोके यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. नवीन यंत्रणेमुळे सीईटीपीतून बाहेर पडणार्‍या स्लज दुर्गंधी विरहीत होणार असून, तो वड्यांच्या स्वरुपात बाहेर पडणार आहे. शहर व परिसरात तयार होणार्‍या प्रोसेसर्स कारखान्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची (सीईटीपी) बांधणी इचलकरंजी पॉवरलूम क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेतून सुमारे २४ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आली आहे. शहरातील पॉवर व हॅण्ड प्रोसेसर्समधून निर्माण होणारे सांडपाणी सीईटीपीमध्ये घेऊन ते प्रदूषण विरहीत केले जाते. अशा प्रकारच्या सुमारे दहा दशलक्ष लिटर पाण्यावर दररोज प्रक्रिया केली जाते. हा प्रकल्प शहरातील नगरपालिका व प्रोसेसर्सधारक संयुक्तरित्या चालवतात. त्याचे व्यवस्थापन वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसिंग असोसिएशनकडे आहे.प्रकल्पातून बाहेर पडणार्‍या स्लजमधून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण होते. म्हणून आसपासच्या वसाहतीत राहणार्‍या वसाहतीतील लोकांनी वारंवार आंदोलने केली. त्यापैकी काही आंदोलनांचे नेतृत्व नगरसेवक अब्राहम आवळे यांनी केले होते. यावर उपाय म्हणून सीईटीपीकडे साठ लाख रुपये खर्चाची फिल्टर प्रेस यंत्रणा सुरू करण्यात आली. सदरची यंत्रणा सुरू करणे आणि प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष गिरीराज मोहता, संचालक लक्ष्मीकांत मर्दा, चंद्रकांत मेटे, संदीप मोघे, संदीप सागावकर, आदींनी परिश्रम घेतले.फिल्टर प्रेस यंत्रणा सुरू होताना शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, माजी नगराध्यक्षा सुमन पोवार, नगरसेवक शशांक बावचकर, अजित जाधव, असोसिएशनचे संचालक श्रीनिवास बोहरा, कामगार नेते शामराव कुलकर्णी, अहमद मुजावर, आदींसह प्रोसेसर्सधारक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)