शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

विकासकामांसाठी ‘सीईओं’ आक्रमक

By admin | Updated: April 17, 2017 00:47 IST

आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच झाडाझडती : बैठकीत अधिकाऱ्यांना कामाची दिशा ठरवून दिली

कोल्हापूर : आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना पुढील कामांची दिशा ठरवून दिली. राजर्षी शाहू सभागृहात तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत त्यांनी काही विभागांची झाडाझडतीही घेतली. आठवड्यातून किमान तीन वेळा डॉ. खेमनार हे जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांचा आढावा घेतात. महिन्यातून एकदा बाराही गटविकास अधिकाऱ्यांचा आढावा घेतला जातो. मात्र शनिवारी (दि. १५) बोलावलेल्या बैठकीला सर्व विभागप्रमुख, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी, महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक डॉ. खेमनार यांनी घेतली. अनेक विभागांचे काम चांगले चालले आहे; परंतु ते अधिक चांगले होण्यासाठी अधिकाऱ्यांनी अधिक योगदान देण्याची गरज व्यक्त करतानाच ज्या ज्या योजनेत कमतरता जाणवते, त्यासाठी आत्तापासूनच तयारी करण्याच्या सूचना दिल्या.