शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शताब्दीतच ‘संगीतसूर्य’ तळपावा !

By admin | Updated: August 8, 2014 00:39 IST

केशवराव भोसले नाट्यगृह : कोल्हापूरची नाट्यचळवळ पडली थंड; नूतनीकरणास वेग गरजेचा

इंदुमती गणेश - कोल्हापूर -- युवराज राजाराम महाराज यांच्या हस्ते १९१५ साली कोल्हापुरात ‘पॅलेस थिएटर’ या नावाने नाट्यगृहाचे उद्घाटन झाले. स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह’ असे नामकरण झाले. या नाट्यगृहामुळे कोल्हापूरची नाट्यपरंपरा बहरत गेली. देशभरात कोल्हापूरची ‘कलापूर’ अशी नवी ओळख रुजली. अनेक दिग्गज कलाकार येथे तयार झाले; मात्र कालांतराने महापालिकेकडे ताबा गेल्यावर नाट्यगृहाच्या दुर्र्दैवाचा फेरा सुरू झाला. नूतनीकरणाचा प्रयोग दोनवेळा फसल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी २०११-१२ साली अर्थसंकल्पात केलेल्या दहा कोटींच्या तरतुदींमुळे नाट्यगृहाला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: जातीने नाट्यगृहाच्या कामाकडे लक्ष दिल्याने महापालिकेनेही ते मनावर घेतले आणि आता नूतनीकरणाचे काम जोमाने सुरू आहे. नाट्यगृह १५ जानेवारीपासून बंद ठेवण्यात आले असले, तरी वर्क आॅर्डर निघून प्रत्यक्ष कामाला १५ मार्चपासून सुरुवात झाली. नाट्यगृहाची इमारत हेरिटेज वास्तू असल्याने त्यासंबंधी अधिक काळजीपूर्वक काम करावे लागत आहे. आता नाट्यगृहाची अंतर्गत डागडुजी, गळती काढणे, दगडी बांधकाम मजबूत करणे, बाल्कनी ही सर्व कामे पूर्ण झाली आहेत. सध्या रंगमंचावरील नूतनीकरणाचे काम सुरू असून, त्याखाली असलेल्या विहिरीलाही गिलावा करण्यात आला आहे. खासबाग मैदानातील दगडी बांधकाम पूर्ण झाले असून, लॉनची लागवड करण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी देण्यात आलेल्या निधींपैकी खासबाग मैदानावर ७२ लाख रुपये, तर नाट्यगृहावर सव्वा कोटी रुपये खर्च झाले आहेत. पुढील वर्षी म्हणजे २०१५ मध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाच्या शताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर एक वर्षाच्या आत नाट्यगृहाचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे. केवळ नाट्यगृहाअभावी थंड पडलेली नाट्यचळवळ पुन्हा नव्या जोमाने सुरू होईल आणि कोल्हापूरचे गतवैभव काही अंशी मिळविण्यात यश येईल.