शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांच्या दिशेवरच केंद्राची सत्ता ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:19 IST

कोल्हापूर : आम्ही तीन राज्यांत हरलो म्हणून काय झाले, आमची मते जास्त आहेत, घाबरू नको, असे अंबाबाईच मला दृष्टांत ...

कोल्हापूर : आम्ही तीन राज्यांत हरलो म्हणून काय झाले, आमची मते जास्त आहेत, घाबरू नको, असे अंबाबाईच मला दृष्टांत देऊन सांगते. आम्ही काम करतोय; पण सद्य:स्थितीत पत्रकार कोणत्या दिशेने वातावरण नेतात, त्यावरच केंद्रात आमची सत्ता पुन्हा येणार, की नाही ते ठरणार आहे, अशी कबुली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. राज्यातही सरकार असेल, मी मंत्री असेन याचीही आता शाश्वती राहिली नाही, तरीही पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यास मी कटिबद्ध असेन, अशी ग्वाहीही पाटील यांनी दिली.पत्रकार दिनाचे औचित्य साधून रविवारी सायंकाळी कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या. ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार भारतकुमार राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अर्जुन टाकळकर, संदीप राजगोळकर, विजय केसरकर, अभिजित पाटील यांचा पुरस्काराने गौरव झाला. संपर्क अ‍ॅडव्हायजर्सचे सुधीर शिरोडकर व मोहन कुलकर्णी यांच्यासह महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक विजय जाधव, प्रा. शिवाजी जाधव, विजय टिपुगडे, मिलिंद यादव यांचा विशेष सन्मान झाला.भारतकुमार राऊत म्हणाले, पत्रकारितेला फुटीरतेचा शापच आहे. तालुक्यापासून देशपातळीवर वेगवेगळ्या संघटनांमध्ये पत्रकार विभागला गेल्याने त्यांची ताकदही क्षीण झाली आहे. शक्तीच विभागली गेल्याने त्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी जटील बनत चालल्याची खंत वाटते.प्रास्ताविक प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष समीर मुजावर, सचिव बाळासाहेब पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.पत्रकारांना कल्पनेपलीकडचे घर मिळेलपत्रकारांच्या घरासाठी आपण कायमच आग्रही असून, कल्पनेच्या पलीकडचे घर त्यांना लवकरच मिळेल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. साडेआठ लाखांतील घरासाठी केंद्र व राज्य सरकारकडून पाच लाखांचे अनुदान मिळवून देत, अवघ्या चार लाखांतील घर पत्रकारांसाठी उपलब्ध करून देणारी योजना तयार करण्यात आली आहे. ‘म्हाडा’च्या निम्म्या किमतीत अशी २00 घरे बांधणार असून, त्यापैकी ५0 घरे ही सैनिकासह नामवंत पत्रकारांसाठी राखीव ठेवली जाणार आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.