जयसिंगपूर : कोविशिल्ड लसीकरण मोहिमेचा प्रारंभ म्हणजे कोरोना विरोधातील लढाईचा सर्वांत महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज असून ही लसीकरण मोहीम राज्यात प्रभावीपणे राबविली जाईल, असे सुतोवात आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. तसेच केंद्र शासनाने कोरोना विरोधातील लस मोफत देण्याच्या यादीत दारिद्र्यरेषेखालील घटकांचा समावेश प्राधान्याने करावा, अशीही मागणी मंत्री यड्रावकर यांनी यावेळी केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोविशिल्ड या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ शनिवारी मंत्री यड्रावकर यांच्या उपस्थितीत शिरोळ ग्रामीण रुग्णालयामधून करण्यात आला. यावेळी माजी आ. उल्हास पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह माने, जि. प. सदस्य अशोकराव माने, पं. स. सभापती कविता चौगुले, डॉ. अनिल माळी, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे, डॉ. कुंभोजकर, डॉ. प्रसाद दातार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मंत्री यड्रावकर यांनी जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच राज्यातील लसीकरण मोहीम केंद्रावरील परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.
फोटो - १६०१२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरोळ येथे ग्रामीण रुग्णालयात कोविशिल्ड लसीकरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर, जि. प. सदस्य अशोकराव माने, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, तहसीलदार अपर्णा मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.