शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: सरकारचा दगाफटका करायचा डाव असेल तर मोठी चूक; रोहित पवारांचा इशारा
2
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
3
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
4
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
5
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
6
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
7
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
8
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
9
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
10
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
11
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
12
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
13
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
14
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
15
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
16
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
17
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
18
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
19
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास

सोशल डिस्टन्सिंग पाळत वटपौर्णिमा साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 20:27 IST

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत यंदा महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. सात जन्म हाच पती मिळावा, या प्रार्थनेत यंदा कोरोनाचे संकट दूर होऊ दे, अशी जोड देत वडाच्या महिलांनी वटवृक्षाचे पूजन केले. एरवी सुवासिनींच्या लगबगीने गजबजून जाणारा अंबाबाई मंदिराचा परिसर यंदा प्रथमच शांत होता.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंग पाळत वटपौर्णिमा साजरी वडाचे झाड लावून पूजन

कोल्हापूर : सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत यंदा महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. सात जन्म हाच पती मिळावा, या प्रार्थनेत यंदा कोरोनाचे संकट दूर होऊ दे, अशी जोड देत वडाच्या महिलांनी वटवृक्षाचे पूजन केले. एरवी सुवासिनींच्या लगबगीने गजबजून जाणारा अंबाबाई मंदिराचा परिसर यंदा प्रथमच शांत होता.पावसाळ्याची सुरुवात, वटपौर्णिमा आणि पर्यावरण दिनाचा योगायोग यंदा जुळून आला. या दिवशी महिला वडाच्या झाडाचे पूजन करून जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, अखंड सौभाग्यही मिळू दे, अशी कामना करतात. व्रतस्थ राहतात. भागाभागांतील महिला नटूनथटून या पूजनासाठी जातात.

यंदा मात्र या नटण्या-थटण्यात आणखी एका वस्तूची भर पडली तो म्हणजे मास्क! कोरोनाने सगळ्यांची दिनचर्याच बदलल्याने महिलांनाही मास्क घालून आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच हा दिवस साजरा करावा लागला.दरवर्षी मोठ्या संख्येने महिला अंबाबाई मंदिराच्या परिसरातील रामाचा पार येथे वटपूजनासाठी येतात. या दिवशी या परिसरात पाय ठेवायलाही जागा नसते इतकी गर्दी होते. यंदा मात्र कोरोनामुळे अंबाबाई मंदिर अजूनही बंद असल्याने महिलांना आपल्या घराजवळील वडाच्या झाडाचा शोध घ्यावा लागला. शिवाय यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा नियमही पाळला गेला.

अनेक महिलांनी कुंडीत वडाची फांदी लावून त्याचीच पूजा केली; तर बहुतांश महिलांनी प्रत्यक्ष झाडाचे पूजन करण्यावर भर दिला. ज्या-त्या भागातील मोजक्या महिलांनी एकत्र येत हा सण साजरा केला.वडाचे झाड लावून पूजनवडाचे पूजन करण्यासाठी त्याच झाडाची फांदी तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करायचा ही मानसिकता आता कमी होत आहे. महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती झाली असून, या सणाला विधायकतेचे रूप देत महिलांनी ठिकठिकाणी वडाचे रोप लावून त्याचे पूजन केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरReligious programmeधार्मिक कार्यक्रम