शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंती १९ तारखेलाच साजरी करा

By admin | Updated: February 7, 2017 00:49 IST

उमेश पोवार : सोमवारी प्रबोधन रॅली; ‘सकल मराठा मावळा’चे आवाहन

कोल्हापूर : महाराष्ट्रात सर्व महापुरुषांची जयंती एकाच दिवशी साजरी केली जात असताना शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मात्र वर्षातून तीनवेळा साजरी करून शिवप्रेमींमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. हे टाळून या महापुरुषाची जयंती १९ फेब्रुवारीलाच सर्वांनी साजरी करावी, असे आवाहन सकल मराठा मावळाचे संघटक उमेश पोवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या इतिहास अभ्यासकांच्या समितीने १९ फेब्रुवारी हीच शिवाजी महाराजांची खरी जन्मतारीख आहे हे सिद्ध केले आहे, तरीही शिवजयंतीच्या तारखेचा वाद काढून शिवप्रेमींमध्ये फूट पाडली जात आहे. राजमाता जिजाऊंची जयंती १२ जानेवारीला, महात्मा फुलेंची जयंती ११ एप्रिलला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला, छत्रपती संभाजी महाराजांची जयंती १४ मे रोजी, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती २६ जूनला आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंची जयंती १ आॅगस्टला साजरी केली जाते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेप्रमाणे साजरी न करता तिथीप्रमाणे साजरी करण्याचा आग्रह केला जातो, असा आग्रह शिवप्रेमींमध्ये फूट पाडणारा आहे. यासाठी सर्व नागरिकांनी व तरुण मंडळांनी एकत्र येऊन १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी. यावेळी विजयकुमार पाटील, संदीप बोरगांवकर, अभिषेक मिठारी, अनिकेत सावंत, नंदकिशोर सुर्वे, नीलेश चव्हाण, रणजित चव्हाण, अनिकेत शिंदे, ओंकार साळोखे, अनिकेत पाटील, आदी उपस्थित होते.जनजागृती शिवजयंतीविषयी नागरिक व तरुण मंडळांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सोमवारी (दि. १३) प्रबोधन रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता बिंदू चौक येथून अत्यंत शिस्तबद्धरीत्या ही रॅली काढली जाईल. त्यात ‘एकच वारी १९ फेब्रुवारी’, ‘जगात भारी १९ फेब्रुवारी’, ‘घरोघरी १९ फेब्रुवारी’ अशा घोषणांचे झेंडे असतील. बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, शिवाजी चौक असा रॅलीचा मार्ग असेल. मंडळांना तीन फुटी पुतळा देणार भेट उमेश पोवार म्हणाले, एकाच दिवशी शिवजयंती साजरी व्हावी यासाठी शहरातील पेठा-पेठांमधील तरुण मंडळांशी संपर्क साधून त्यांना आवाहन केले जात आहे. जी मंडळे १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करणार आहेत व ज्यांच्याकडे शिवरायांची उत्सवमूर्ती नाही त्यांना संघटनेतर्फे शिवरायांची तीन फूट उंचीचा पुतळा भेट देण्यात येणार आहे, तरी अशा मंडळांनी ११ तारखेपर्यंत अतुल शॉपी (मारुती मंदिराशेजारी, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.