शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

शंभरी गाठलेल्या तरुणाचा वाढदिवस साजरा

By admin | Updated: January 17, 2015 00:42 IST

गोतावळाही सहभागी : मंगळवार पेठेतील मंडळांनी घेतला पुढाकार

कोल्हापूर : सध्याच्या जमान्यात शंभरी पूर्ण केलेल्या असंख्य संस्था आपण पाहतो. कारण इतका प्रदीर्घ काळ केवळ चांगले कार्य करणाऱ्या संस्थाच अस्तित्व टिकवू शकतात, परंतु शंभरी ओलांडलेली व्यक्ती अपवादानेच पाहायला मिळते. निरोगी आयुष्य जगलेली व्यक्ती जेव्हा शंभरी पार करते त्यावेळी त्या व्यक्तीचा समाजाला हेवाच वाटतो. असाच हेवा मंगळवार पेठेतील आप्पासाहेब लिंगोजी आळवेकर यांच्याबाबतीत शुक्रवारी पाहायला मिळाला. आप्पासाहेब आळवेकर यांनी आज शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्यांचा आनंद अख्ख्या मंगळवार पेठेतील नागरिकांना झाला. त्यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. सुबराव गवळी तालीम, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, न्यू संभाजी तरुण मंडळ, जय पद्मावती मित्रमंडळ, रॅश ग्रुप, श्रीराम तरुण मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे आळवेकरांचा संपूर्ण गोतावळा सहभागी झाला होता तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, अनिलपंत कोरगांवकर, निवासराव साळोखे, माजी महापौर शिवाजीराव कदम, प्रा. जयंत पाटील यांच्यासारखे मान्यवरही आवर्जून उपस्थित होते. आळवेकर यांचे मूळ गाव येवती (ता. करवीर) असून, घरची शेती सांभाळून त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. पाटील यांनी तलाठी कोर्सही पूर्ण केला. पुढे त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. महसूल विभागात सिनीअर ग्रामसेवक, सर्कल इन्स्पेक्टर अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या. संपूर्ण सेवेत केवळ चार महिने रजा घेतली. आप्पासाहेब यांच्या संसाराचा वेल चांगलाच फुलला आहे. तीन मुले, तीन मुली, २० नातवंडे, २६ परतवंडे असा त्याचा परिवार विस्तारला आहे. आप्पासाहेब यांचे वडील लिंगोजी ११५, तर आई सईबाई ११० वर्षे जगल्या. दीर्घायुष्याचा वारसा आता आप्पासाहेबांनाही लाभला आहे. निर्व्यसनी व कष्टाची वृत्ती हेच त्यांच्या दीर्घायुष्याचे गमक असल्याचे ते सांगतात.