शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

काळभैरी यात्रेतही सीसीटीव्हीचा वॉच!

By admin | Updated: February 19, 2016 00:21 IST

गडहिंग्लजची २४ ला यात्रा : अधिकाऱ्यांकडून यात्रास्थळाची पाहणी

गडहिंग्लज : सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरीच्या वार्षिक यात्रेतही ‘सीसीटीव्ही’चा वॉच राहणार आहे. भाविकांच्या गर्दीमुळे होणाऱ्या अनुचित प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘सीसीटीव्ही’ बसविण्याचा निर्णय झाला. दोन दिवसांच्या यात्रेला मंगळवारी (दि. २३) पालखी मिरवणुकीने प्रारंभ होईल. बुधवारी (दि. २४) यात्रेचा मुख्य दिवस आहे.सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार, तहसीलदार हनुमंत पाटील, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, आदींसह विविध खात्यांच्या प्रमुखांनी डोंगरावरील यात्रास्थळाची पाहणी केली. यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी तत्काळ दूर करण्याच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांनी दिल्या. जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष निरंजन कित्तूरकर, मारुती राक्षे यांनीही सूचना मांडल्या.डोंगरावरील मंदिर परिसरात जाळ रेषा काढण्याची सूचना करण्यात आली. अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून नैवेद्य दाखवून परत घरी घेऊन जावे, आंबील वाटप व नारळ कमानीबाहेर फोडावेत, असे भाविकांना आवाहन करण्यात आले आहे.यावेळी गटविकास अधिकारी शाम वाखार्डे, सहायक गटविकास अधिकारी प्रदीप जगदाळे, वनखात्याचे राजन देसाई, तालुका आरोग्य अधिकारी मल्लिकार्जुन अथणी, नगरपालिकेचे जलअभियंता जमीर मुश्रीफ, आण्णाराव रिंगणे, विठ्ठल भमानगोळ, सुधीर पाटील, आदींसह मंदिराचे पुजारी, मानकरी, अवनी फौंडेशन व अनिरूद्ध उपासना केंद्राचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पोलिओ लसीकरण पल्स् पोलिओचा डोस चुकू नये म्हणून यात्रेत पल्स् पोलिओ लसीकरण पथक तैनात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर १०८ रूग्णवाहिकेसह तीन रूग्णवाहिका आणि आरोग्य पथकही सज्ज ठेवण्यात येणार आहे.