शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सीपीआरमध्ये होणार कॅन्सरवर अत्याधुनिक उपचार

By admin | Updated: May 10, 2017 00:59 IST

‘कॅन्सर ग्रिड’मध्ये समावेश : टाटा मेमोरियल रिसर्च सेंटर देणार प्रशिक्षण; खासगी रुग्णालयांपेक्षा माफक दरात सेवा

गणेश शिंदे ।  -लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचा (सीपीआर) नॅशनल कॅन्सर ग्रिडममध्ये समावेश झाला आहे. या निर्णयामुळे कोल्हापुरात कॅन्सरच्या रुग्णांसाठी माफक दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणार आहेत. याकरिता ‘सीपीआर’मधील विविध विभागांच्या तज्ज्ञ डॉक्टरांना मुंबईच्या टाटा मेमोरियल रिसर्च सेंटरमध्ये प्रशिक्षण किंवा टाटा मेमोरियलचे तज्ज्ञ या ठिकाणी येऊन प्रशिक्षण देणार आहेत.राज्यात १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. सध्या मुंबई, नागपूर, पुणे व औरंगाबाद या ठिकाणी नॅशनल कॅन्सर ग्रिड आहे. आशिया खंडातील कॅन्सर रुग्णांसाठी वरदान असलेले टाटा मेमोरियल रिसर्च सेंटर हे सर्वात मोठे रुग्णालय आहे. या सेंटरमध्ये कॅन्सररुग्णांचे ५२५ बेड आहेत. येथे देशभरातून सर्वाधिक कॅन्सररुग्ण येतात. वाढत्या रुग्णसंख्येमुळे येथील यंत्रणेवर ताण पडतो. त्यामुळे सीपीआर रुग्णालयाचा नॅशनल कॅन्सर ग्रिडमध्ये समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या ‘सीपीआर’मध्ये रोज सरासरी २५, तर वर्षाला सुमारे ३०० कॅन्सररुग्णांवर शस्त्रक्रिया होतात. आॅपरेशन करून गाठ काढणे, औषध (केमोथेरपी), किरणोत्सर्गाद्वारे उपचार करणे असे विविध प्रकारचे उपचार आहेत. कॅन्सरमधील विविध पेशींसाठी लिनोअर अ‍ॅक्सिलरेटर ही यंत्रसामग्री बसविण्यात येणार आहे. या यंत्रसामग्रीची सुमारे १५ कोटी रुपये किंमत आहे; तर बंकरसाठी पाच कोटी रुपये लागणार आहेत. कोल्हापूरसह कोकणातील रुग्णांची गरज ओळखून ‘सीपीआर’मधील अभ्यागत समितीने ‘कॅन्सर ग्रिड’साठी प्रयत्न सुरू केले होते, त्याला यश आले आहे.आरोग्य सेवेचे विकेंद्रीकरणमुंबईच्या टाटा मेमोरियल रिसर्च सेंटरमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांवर वेळेत उपचार होऊ शकत नाहीत. रुग्णांना वेळेत उपचार होण्यासाठी राज्य शासनाने कोल्हापूरचा क ॅन्सर ग्रिडमध्ये समावेश केला आहे. भविष्यात राज्यातील आणखी मोठ्या शहरांचा कॅन्सर ग्रिडमध्ये समावेश करून आरोग्य सेवेचे विकेंद्रीकरण करण्यावर शासनाचा भर राहणार आहे.२०, २१ ला मुंबईत बैठक...कॅन्सर ग्रिडच्या संकल्पनेबाबत माहिती देण्यासाठी परेल येथील टाटा मेमोरियल रिसर्च सेंटरमध्ये २० व २१ मे रोजी बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यासाठी देशभरातून तज्ज्ञ उपस्थित राहणार असून, तेथील वैद्यकीय अधिकारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रसह कोकणातील रुग्णांना लाभ‘सीपीआर’मध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकणसह सीमाभागातील कॅन्सररुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या भागातील कॅन्सररुग्णांचे मुंबई व पुण्याला जाण्यासाठी हेलपाटे वाचणार आहेत. कोल्हापूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे.नॅशनल कॅन्सर ग्रिडमध्ये समावेश होण्यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले. यामुळे अत्याधुनिक पद्धतीचे उपचार माफक दरात गरीब रुग्णांना मिळण्यास मदत होणार आहे. - डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर.काय आहे कॅन्सर ग्रिड ?राज्यात औरंगाबाद, नागपूर व पुणे या ठिकाणी कॅन्सर ग्रिड सुरू करण्यात आले आहे. आता त्यामध्ये कोल्हापूरचा समावेश झाला आहे. कॅन्सर ग्रिडमध्ये उपचारासाठी वैद्यकीय तज्ज्ञ आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जाते.