शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
5
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
6
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
7
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
8
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
10
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
11
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
12
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
13
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
14
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
15
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
16
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
17
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
18
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
19
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
20
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट

सोळा ठिकाणी सीसी कॅमेरे

By admin | Updated: March 11, 2015 00:03 IST

जोतिबा यात्रा : सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्णय; जिल्हा प्रशासनाची बैठक

कोल्हापूर : दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा देवस्थानच्या यात्रेत पुजाऱ्यांकडून येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड देण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे ‘व्हीआयपी’च्या नावाखाली थेट देवदर्शन घेण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. सुरक्षेच्या कारणावरून सोळा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. वाडी रत्नागिरी येथील श्रीक्षेत्र जोतिबा देवस्थानची चैत्र यात्रा चार एप्रिलला होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनाच्या तयारीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार होते. यावेळी देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, जोतिबाच्या सरपंच रिया सांगळे, उपसरपंच दत्तात्रय दादर्णे, कोडोलीचे सहायक पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, शाहूवाडी पोलीस उपअधीक्षक किसन गवळी, तहसीलदार प्रशांत पिसाळ, पन्हाळा प्रांताधिकारी रवींद्र खाडे, प्रियदर्शनी मोरे उपस्थित होत्या.यावेळी पोलीस प्रशासनाने ‘व्हीआयपी म्हणजे नक्की कोणते भाविक हे एकदा स्पष्ट झाले पाहिजे,’ अशी मागणी केली. दरवर्षी व्हीआयपी म्हणून पुजाऱ्यांच्या मागून किमान दीड ते दोन हजार भाविक जोतिबाच्या गाभाऱ्यात जातात. त्यामुळे अन्य भाविकांवर अन्याय होतो. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनावर मोठा ताण येतो. केंद्राच्या दहशतवादविरोधी पथकाने मंदिराच्या परिसरात कोंडाळे असू नयेत व गाभाऱ्यात जाणारे भाविक सोवळे नेसतात, ती जागा बदलण्यात यावी, अशा सूचना केल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी कशी करायची, असा प्रश्न पोलिसांनी मांडला. त्यावर भाविकांनी मंदिरात येण्यापूर्वीच सोवळे नेसावे व पुजाऱ्यांकडून येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड ठेवण्यात यावा, हा उपाय सूचविण्यात आला. गतवर्षीप्रमाणे यंदाही दुचाकी गाड्यांच्या पार्किंगची सोय डोंगराच्या पायथ्याशी करण्यात येणार आहे आणि भाविकांच्या सोयीसाठी एसटी व केएमटी बसेसची सुविधा उपलब्ध असेल. यावेळी पाणीपुरवठा विभाग, परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, प्रादेशिक परिवहन अशा सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी यात्रेच्या तयारीची माहिती दिली. तयारीची पुढील आढावा बैठक सोमवारी ( दि. २३) जोतिबा डोंगर येथेच होणार आहे. (प्रतिनिधी)सोळा ठिकाणी सीसी कॅमेरेजोतिबा यात्रा : सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्णय; जिल्हा प्रशासनाची बैठक कोल्हापूर : दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा देवस्थानच्या यात्रेत पुजाऱ्यांकडून येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड देण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे ‘व्हीआयपी’च्या नावाखाली थेट देवदर्शन घेण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. सुरक्षेच्या कारणावरून सोळा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. वाडी रत्नागिरी येथील श्रीक्षेत्र जोतिबा देवस्थानची चैत्र यात्रा चार एप्रिलला होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनाच्या तयारीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार होते. यावेळी देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, जोतिबाच्या सरपंच रिया सांगळे, उपसरपंच दत्तात्रय दादर्णे, कोडोलीचे सहायक पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, शाहूवाडी पोलीस उपअधीक्षक किसन गवळी, तहसीलदार प्रशांत पिसाळ, पन्हाळा प्रांताधिकारी रवींद्र खाडे, प्रियदर्शनी मोरे उपस्थित होत्या.यावेळी पोलीस प्रशासनाने ‘व्हीआयपी म्हणजे नक्की कोणते भाविक हे एकदा स्पष्ट झाले पाहिजे,’ अशी मागणी केली. दरवर्षी व्हीआयपी म्हणून पुजाऱ्यांच्या मागून किमान दीड ते दोन हजार भाविक जोतिबाच्या गाभाऱ्यात जातात. त्यामुळे अन्य भाविकांवर अन्याय होतो. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनावर मोठा ताण येतो. केंद्राच्या दहशतवादविरोधी पथकाने मंदिराच्या परिसरात कोंडाळे असू नयेत व गाभाऱ्यात जाणारे भाविक सोवळे नेसतात, ती जागा बदलण्यात यावी, अशा सूचना केल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी कशी करायची, असा प्रश्न पोलिसांनी मांडला. त्यावर भाविकांनी मंदिरात येण्यापूर्वीच सोवळे नेसावे व पुजाऱ्यांकडून येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड ठेवण्यात यावा, हा उपाय सूचविण्यात आला. गतवर्षीप्रमाणे यंदाही दुचाकी गाड्यांच्या पार्किंगची सोय डोंगराच्या पायथ्याशी करण्यात येणार आहे आणि भाविकांच्या सोयीसाठी एसटी व केएमटी बसेसची सुविधा उपलब्ध असेल. यावेळी पाणीपुरवठा विभाग, परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, प्रादेशिक परिवहन अशा सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी यात्रेच्या तयारीची माहिती दिली. तयारीची पुढील आढावा बैठक सोमवारी ( दि. २३) जोतिबा डोंगर येथेच होणार आहे. (प्रतिनिधी)