शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम फोडून साडेआठ लाखांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कावळा नाका ते मार्केट यार्ड रस्त्यावर मुक्त सैनिक वसाहत येथील रत्नाकर बँकेचे एटीएम सेंटर चोरट्यांनी फोडून साडेआठ लाखांची रोकड लंपास केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. रस्त्यालगत असलेल्या या एटीएम सेंटरचे मशीन गॅसकटरच्या साहाय्याने कापून त्यातील शंभर, पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा चोरून चोरटे पसारझाले. गॅसकटरमुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कावळा नाका ते मार्केट यार्ड रस्त्यावर मुक्त सैनिक वसाहत येथील रत्नाकर बँकेचे एटीएम सेंटर चोरट्यांनी फोडून साडेआठ लाखांची रोकड लंपास केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. रस्त्यालगत असलेल्या या एटीएम सेंटरचे मशीन गॅसकटरच्या साहाय्याने कापून त्यातील शंभर, पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा चोरून चोरटे पसारझाले. गॅसकटरमुळे मशीन आतून पूर्ण जळाले आहे.अधिक माहिती अशी, ताराबाई पार्क येथील रत्नाकर बँकेचे (आरबीएल) एटीएम सेंटर मुक्त सैनिक वसाहत येथे मुख्य रस्त्याकडेला आहे. त्याच्या शेजारी टुरो ट्रॅव्हल्स अ‍ॅँड टूर्सचे कार्यालय आहे. गेल्या पाच वर्षांपासून एजीएस ट्रॅँझेशन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, मुंबई या कंपनीचे एजीएस एटीएम मशीन आहे. कंपनीचे कॅशिअर सुनील चौगुले व प्रशांत मुचंडी यांनी मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मशीन तपासले असता त्यामध्ये ५ लाख ५० हजार रुपये होते. त्यामध्ये आणखी तीन लाखांची कॅश भरली. त्यामुळे सुमारे साडेआठ लाख रुपये एटीएम मशीनमध्ये होते. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पुन्हा कॅशिअर चौगुले व मुचंडी कॅश भरण्यासाठी या ठिकाणी आले. बाहेरून एटीएम सेंटरचे शटर बंद असल्याने त्यांना शंका आली. शटर उघडून पाहिले असता आतमध्ये एटीएम मशीन फोडलेले दिसले.ही बाब त्यांनी बँकेचे व्यवस्थापक महादेव चिकुर्डेकर यांना मोबाईलवरून कळविली. चिकुर्डेकर यांनी काही प्रतिनिधींना तत्काळ घटनास्थळी पाठविले. एटीएम कंपनीचे प्रतिनिधी विनय हसबनीस आले. त्यांनी पोलीस कंट्रोल रूमला फोनवर चोरीची माहिती दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे व शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यापाठोपाठ शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर आले. त्यांनी एटीएम सेंटरची पाहणी केली. झेबा श्वान घटनास्थळी आले. मशीन जळाल्यामुळे चोरट्यांच्या हातांचे ठसे मिळाले नाहीत. तसेच दुर्गंधी सुटल्याने श्वान माघारी परतले. पोलीस शहरातील व शहराबाहेरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या प्रकरणी एटीएम कंपनीचे फिल्ड आॅफिसर विनय हसबनीस यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.रात्री दीड वाजता शेवटची रक्कम काढलीएटीएम सेंटरमधील सीसीटीव्हीची हार्ड डिस्क सुस्थितीत असल्याने त्याचे चित्रीकरण पाहिले असता मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास एका तरुणाने सहा हजार रुपये एटीएममधून काढल्याचे दिसत आहे. त्यानंतर पहाटे तीनच्या पुढे पूर्णत: अंधार दिसत आहे. तिघा-चौघा चोरांचे हे कृत्य असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.जबाबदारी झटकण्याचा प्रयत्नएजीएस ट्रॅँझेशन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, मुंबईने बसविलेल्या या एटीएम मशीनची किंमत साडेचार लाख रुपये आहे. जर्मनीतून ते आणले आहे. या मशीनला कोणतीही सुरक्षा नाही. अलार्म नाही. या ठिकाणी सुरक्षारक्षकही नाही. चोरीनंतर पोलिसांनी एटीएम कंपनीच्या व बँकेच्या प्रतिनिधींकडे चौकशी केली असता दोघांनीही सुरक्षारक्षक नियुक्तीची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी शहरातील सर्व बँकांना व एटीएम सेंटर कंपन्यांना सुरक्षारक्षक नियुक्ती करण्यासंबंधी पोलीस प्रशासनाकडून नोटिसा पाठविल्या आहेत. इतकी मोठी रक्कम एटीएम सेंटरमध्ये ठेवली जाते; परंतु तिथे सुरक्षारक्षक नियुक्त केला जात नाही. याबद्दल पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींची कानउघाडणी केली.