शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मिरजेतील सराईताचा कर्नाटकात शोध

By admin | Updated: March 25, 2015 01:18 IST

पथकांचा कर्नाटकात तळ : वसतिस्थाने, हॉटेलमध्ये झाडाझडती

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांची हत्या मिरज येथील एका सराईत गुन्हेगाराने केल्याच्या संशयावरून कोल्हापूर पोलीस त्याचा कर्नाटकात कसून शोध घेत आहेत. येथील गुन्हेगारी वसतिस्थाने, हॉटेल-लॉजचे झडतीसत्र सुरू असून, येथील सराईत गुन्हेगारांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून त्याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांच्या विशेष सूत्रांनी सांगितले. मिरजेतील दाम्पत्याने दिलेल्या माहितीची पोलीस अत्यंत बारकाईने चाचपणी करत आहेत. संबंधित गुन्हेगार हा पानसरे यांच्यावरील हल्ल्यापासून गायब असल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. त्यामुळे कोल्हापूर येथील काही विशेष पथके बंगलोर, बेळगावसह सीमाभागात तळ ठोकून आहेत. पोलिसांचा तपास सुरुवातीपासूनच गोपनीय पातळीवर सुरू आहे. त्याची चाहूल कोणालाही लागू नये, याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे. पोलिसांची २५ विशेष पथके काम करीत आहेत. प्रत्येक पथकाचा स्वतंत्र तपास सुरू आहे. त्याची एकमेकांना माहिती दिली जात नाही. पोलीस अधीक्षक शर्मा या सर्वांकडून एकत्रित माहिती घेत आहेत. (प्रतिनिधी)कोल्हापूरच्या बाहेर तपास हत्येचे गूढ उकलण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारी टोळ्यांकडे आतापर्यंत दहा ते बारावेळा ताब्यात घेऊन चौकशी केली असता कोणताच धागादोरा हाती लागला नाही. तपासाचे धागेदोरे मिरज-कर्नाटकात मिळण्याची दाट शक्यता पोलिसांना आहे. त्यामुळे शहरात राजारामपुरी, जुना राजवाडा, करवीर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांवर तपासाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांचा आढावा इचलकरंजी विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार हे सुभाषनगर पोलीस चौकीतून घेत आहेत तर सुमारे वीस पथके कर्नाटक, मिरज, सांगली व कऱ्हाड परिसरात तपास करीत असल्याचे समजते. पानसरे हत्या प्रकरण