शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’ अध्यक्षपदाबाबत नेत्यांची सावध भूमिका

By admin | Updated: September 12, 2016 01:06 IST

तातडीने निर्णयाची शक्यता धूसर : ‘पी. एन.’ यांच्या कार्यकर्त्यांत चर्चा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ)च्या अध्यक्षपदाबाबत माजी आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी सावध भूमिका घेतली आहे. सर्वसाधारण सभेतील वातावरण, त्यातून अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर नेते तातडीने निर्णय घेण्याची शक्यता धूसर बनली आहे. सर्वसाधारण सभेनंतर ‘गोकुळ’च्या दुधाने चांगलीच उकळी घेतली आहे. विरोधकांचे आव्हान ताकदीने मोडण्याची सत्तारूढ गटाची रणनीती काही प्रमाणात यशस्वी झाली; पण शेवटच्या क्षणी गोंधळ उडाल्याने सभेला गालबोट लागले. त्यातून ‘गोकुळ’मधील अंतर्गत राजकारणाने वेग घेतला आहे. ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी अध्यक्षपदाबाबत घेतलेल्या उघड भूमिकेने ‘गोकुळ’च्या राजकारणात पडसाद उमटलेच; पण त्याचबरोबर पी. एन. पाटील यांच्या कार्यकर्त्यांत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. नरके यांनी ‘करवीर’च्या राजकारणातून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला असला तरी ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा उघड प्रचार करणार का? तेथून पुढच्या राजकारणात ते पाटील यांच्याबरोबर राहणार का? असे विविध प्रश्न ‘पी. एन.’ यांच्या कार्यकर्त्यांमधून विचारले जात आहेत. नरके यांना अध्यक्षपद द्यायचेच झाले तर त्यांनी ‘पी. एन.’ यांना उघड पाठिंबा आताच जाहीर करावा व त्याच्याशी ते ठाम राहिले पाहिजेत, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांतून व्यक्त केली जात आहे. अध्यक्षपदावरून सुरू झालेले राजकारण पाहता, नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची शक्यता धूसर बनली आहे. (प्रतिनिधी) ‘गोकुळ’कडून स्पष्टीकरणाला विलंब! ४वार्षिक सर्वसाधारण सभेतील आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आरोपावर ‘गोकुळ’च्या वतीने स्पष्टीकरण देतील, असे वाटत होते; पण सभा संपून पाच दिवस झाले तरी त्यांच्याकडून स्पष्टीकरण झाले नसल्याने संस्थापातळीवर याची चर्चा सुरू आहे यूथ बँक सभास्थळीही चर्चा ४यूथ डेव्हलपमेंट बॅँकेची रविवारी सर्वसाधारण सभा होती. या बॅँकेचे अध्यक्ष अरुण नरके असल्याने त्यांनी ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाबाबत घेतलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा सभास्थळी होती. .