शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्याकडून चाळीस तोळे दागिने हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 01:06 IST

कोल्हापूर : शहरात पहाटे घरफोड्यांचा धुमाकूळ घालणारा अट्टल चोरटा रसूल अन्वर सय्यद (वय २७, रा. सदर बाजार) याने ३४ ...

कोल्हापूर : शहरात पहाटे घरफोड्यांचा धुमाकूळ घालणारा अट्टल चोरटा रसूल अन्वर सय्यद (वय २७, रा. सदर बाजार) याने ३४ घरफोड्यांची कबुली दिली आहे.त्याच्याकडून ४० तोळे दागिने हस्तगत केल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. अमृतकर यांनी सांगितले, शहरातील वाढत्या घरफोड्या रोखणे आणि उघडकीस आणणे हे पोलिसांसाठी आव्हान होते.शाहूपुरीचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत घोलप आणि विजय इंगळे हे पेट्रोलिंग करताना रेकॉर्डवरील सराईत चोरटा रसूल सय्यद हा पळून जाऊ लागला. पाठलाग करून त्याला या दोघांनी पकडले. त्याच्याजवळ दागिने व मोबाईल मिळाला. चौकशीमध्ये १३ नोव्हेंबरला पहाटे चारच्या सुमारास अयोध्या कॉलनी कदमवाडी येथील घराचा दरवाजा उघडा दिसल्याचा पाहून त्या ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस कोठडीत त्याने सदर बाजार, ताराबाई पार्क, रमणमळा येथे महिन्याभरात बारा घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी ४० तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल, साडेचार हजार रुपये जप्त केले. संशयित सय्यदने चोरीचे दागिने गुजरीतील काही सराफांना पत्नी व मित्रांच्या मध्यस्थीने विकले होते. त्यानुसार पोलिसांनी सहा सराफांना साक्षीदार करून त्यांच्याकडून दागिने हस्तगत केले. संशयित सय्यद हा बालगुन्हेगार होता. चोरी आणि घरफोडीमध्ये हातखंडा आहे. त्याने पोलिसांच्या तपासाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला आहे; त्यामुळे सहजासहजी तो मिळून येत नसे. त्याने गेल्या नऊ वर्षांमध्ये ३४ घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सेट्रिंग काम करत तो पहाटे रेकी करून चोरी करतो.----------------यांचे मिळणार दागिनेरिया धनंजय दामुगडे (रा. गणेश पार्क, कदमवाडी), प्रताप राजाराम नाईक (रा. पाचगाव), डॉ. स्मिता हिरालाल चोपडे (रा. कोल्हापूर), सौरभ उमेश पाटील, अनुराधा चंद्रकांत भोसले, संतोष कृष्णात भारमल, राहुल भिकाजी बोडके, शंकर भागोजी वरक, महादेव गुंडू भोसले,(सर्व रा. कदमवाडी), लक्ष्मण हरी पाटील (रा. ताराबाई पार्क), आनंदा राजाराम कांबळे (निंबाळकर कॉलनी, कोल्हापूर), अभिजित गणपतराव पाटील-आंदळकर (रमणमळा).