शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांचे मांडव लोकसभा निवडणुकीसाठी सजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 11:04 IST

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजताक्षणी उमेदवारांची पळापळ सुरू झाली आहे. उमेदवारांनी आपापल्या कार्यालयांसमोर मांडव घालून ठेवले आहेत.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे मांडव सजलेकार्यालयात निवडणुकीच्या कोणत्याच हालचाली नाहीत

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजताक्षणी उमेदवारांची पळापळ सुरू झाली आहे. उमेदवारांनी आपापल्या कार्यालयांसमोर मांडव घालून ठेवले आहेत.

जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन्हीही लोकसभा मतदारसंघांत पक्षापेक्षा व्यक्तीला महत्त्व असल्याने त्या दृष्टीनेच उमेदवारांनी आपले घर हेच निवडणुकीचे अधिकृत प्रचार कार्यालय केले आहे. पक्षकार्यालय शांत असले तरी वैयक्तिक कार्यालयांतील लगबग मात्र वाढीस लागली आहे. मांडवात बसण्यासाठी खुर्च्यांपासून ते चहापाण्यासह जेवणाची सोय करण्याचे कामही वेगात सुरू आहे.

कोल्हापुरातील राजेश मोटर्स येथील गॅरेजवर राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांचे प्रचार कार्यालय सुरू झाले आहे. तेथे भला मोठा मंडप उभारण्यात आला आहे./फोटो नसीर अत्तार

राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक हेच यावेळी पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत; पण त्यांची सर्व सूत्रे राष्ट्रवादीच्या शहर व जिल्हा कार्यालयाऐवजी राजेश मोटर्स येथील गॅरेजवरील महाडिकांच्या अधिकृत कार्यालयातून हलू लागली आहेत.

तेथेच मोठा मंडप उभारण्यात आला असून राष्ट्रवादी पक्षाच्या झेंड्याची पार्श्वभूमी असलेले व्यासपीठही तयार करण्यात आले आहे. आता मतदान आणि निकाल लागेपर्यंत सर्व यंत्रणा येथूनच राबविणार असल्याचे कार्यालयातील व्यक्तींनी सांगितले.प्रा. संजय मंडलिक हे शिवसेनेचे उमेदवार आहेत; पण त्यांचे प्रचार कार्यालय रुईकर कॉलनीतील घरातच थाटण्यात आले आहे. भगव्या रंगाचे कापड वापरून बंगल्याच्या समोरच लॉनवर मंडप उभारण्यात आला आहे.

तेथेच व्यासपीठासह बसण्यासाठी खुर्च्या अंथरण्यात आल्या आहेत. चहापाण्याची सोयही येथेच उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथूनच पुढील सर्व प्रचाराची सूत्रे हलणार असल्याचे कार्यालयातील प्रमुखांनी सांगितले.हातकणंगले मतदारसंघातील खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाचे कार्यालय कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे; पण त्यांच्या प्रचाराची सर्व सूत्रे जयसिंगपूरमधील त्यांच्या घरातूनच हलणार आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून धैर्यशील माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी अजून प्रचार कार्यालय सुरू केले नसले तरी सध्या तरी रुईकर कॉलनीतील त्यांच्या बंगल्यातूनच सूत्रे हलविली जात असल्याचे सांगण्यात आले.यावेळची निवडणूक ही पक्षापेक्षा व्यक्तिगत स्वरूपाची जास्त दिसत असल्याने उमेदवार असणाऱ्या नेत्याला खूप महत्त्व आले आहे. त्यामुळे पक्षाच्या मूळच्या कार्यकर्त्यांपेक्षा उमेदवार नेत्यांच्या जवळच्या माणसांनी प्रचार कार्यालयांचा ताबा आपल्याकडे घेतल्याचेच आतापासून दिसत आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर झाली की दरवर्षी पक्षांच्या अधिकृत कार्यालयात दिसणारी लगबग आणि होणाऱ्या जोर-बैठका यावेळी अजून तरी दिसत नाहीत.शिवाय देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस व भाजप या पक्षांकडे या दोन्हीही मतदारसंघांतील उमेदवारी नसल्याने त्यांच्या कार्यालयात निवडणुकीच्या कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. नेते, कार्यकर्ते सध्या तरी निवांत दिसत आहेत.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९kolhapurकोल्हापूर