सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी काय टीका केली, हे मला माहीत नाही. ते माझ्या संघटनेचे ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्याविरोधात मी काय बोलणार, अशी प्रतिक्रिया कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. माझा मुलगा सागर याची बागणी (ता. वाळवा) गटातील उमेदवारी खा. शेट्टी यांच्याशी चर्चा करूनच रयत विकास आघाडीच्या नेत्यांनी निश्चित केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.खा. शेट्टी यांनी सोमवारी सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या उमेदवारीला विरोध करत आपण तेथे प्रचाराला जाणार नसल्याचे सांगितले होते. खोत यांची घराणेशाही मान्य नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्याबाबत खोत यांना विचारले असता ते म्हणाले की, वाळवा तालुक्यातील प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकविण्यासाठी बहुतांशी पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन रयत विकास आघाडी केली आहे. त्यावेळी निवडून येण्याची शक्यता असलेल्यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय आघाडीच्या सर्व नेत्यांनी घेतला होता. आघाडीचे नेते आमदार शिवाजीराव नाईक, राज्यातील घराणेशाहीवर बोललो : राजू शेट्टीकोल्हापूर : राज्यात पिढ्यान्पिढ्या सुरू असलेल्या घराणेशाहीला आमचा विरोध आहे आणि राहणार आहे. सदाभाऊ खोत यांच्या घराणेशाहीवर आपण बोललो नसल्याचे स्पष्ट करीत त्यांच्या आणि आपल्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ‘यू’ टर्न घेतला. -वृत्त/२भाजपसह मित्रपक्षांचा प्रचार करणारसत्ता की संघटना, यापैकी नेमकी कोणती निवड करायची, हा प्रश्न सध्यातरी माझ्यासमोर नाही. माझ्यावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी टाकली आहे, ती आधी पूर्ण करणार आहे. भाजप सरकारचे काम चांगले चालू असून, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. भाजपसह अन्य मित्रपक्षांच्या प्रचारालाही मी जाणार आहे. भाजपचे नेते संघटनेच्या कार्यकर्त्यांना फूस लावतात, हा अनुभव मला तरी अजून आलेला नाही, असे स्पष्टीकरणही सदाभाऊ खोत यांनी दिले.
राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करूनच मुलाला उमेदवारी
By admin | Updated: February 15, 2017 01:13 IST