शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंतदादा’चा गाळप परवाना रोखला

By admin | Updated: November 18, 2014 01:00 IST

साखर आयुक्तांचा निर्णय : ऊसबिले न दिल्याचा परिणाम; गाळपाचा प्रश्न गंभीर

सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने मागच्या हंगामातील ३१ कोटीची ऊसबिले दिली नसल्याने साखर आयुक्तांनी यंदाच्या हंगामाचा परवाना रोखला आहे. शेतकऱ्यांचे थकीत बील दिल्यानंतरच परवाना देण्यात येईल, असे आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे. याप्रकरणी शेतकरी संघटनेने आयुक्तांकडे तक्रार केली होती. यामुळे कारखान्याचा यंदाचा हंगाम सुरू होण्यात अडचणी निर्माण झाल्या असून, कार्यक्षेत्रातील उसाच्या गाळपाचा प्रश्न गंभीर बनला आहे.वसंतदादा कारखान्याकडे शेतकऱ्यांची ऊसबिले, जिल्हा बँक आणि व्यापाऱ्यांची देणी थकली आहेत. कारखान्याने ही देणी भागवण्यासाठी २१ एकर जागा विक्रीला काढली आहे. मात्र, विक्री प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे ऊसबिले अद्यापही दिलेली नाहीत. त्यामुळे कारखान्याच्या यंदाच्या हंगामाबाबत उलट-सुलट चर्चा रंगू लागली. मात्र, कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी धाडसाने गळीत हंगामाची पूर्ण तयारी केली. दि. १० नोव्हेंबरला बॉयलर पेटवण्यात आला. त्यावेळी त्यांनी ‘अनेकांनी कारखाना बंद राहण्यासाठी देव पाण्यात ठेवले होते’, अशी टीका विरोधकांवर केली होती. याबाबत अध्यक्ष विशाल पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. (प्रतिनिधी)वसंतदादा कारखान्याने २०१४-१५ वर्षातील गाळप परवान्यासाठी अर्ज केला होता. परंतु, त्यांनी शेतकऱ्यांची बिले दिलेली नाहीत, अशा तक्रारी होत्या. वस्तुस्थिती पाहिली असता त्यास दुजोरा मिळाला आहे. त्यामुळे अद्यापि कारखान्यास गाळप परवाना दिलेला नाही. सर्व बिले भागविल्याचा दाखला दिल्यास त्यांना परवाना मिळू शकतो.- पांडुरंग शेळके,प्रादेशिक सहसंचालक (विकास), पुणे. साखर आयुक्तांकडे तक्रारकारखान्याने मागील हंगामातील ऊसबिले दिली नसल्याबाबत शेतकरी संघटनेने पुणे येथील साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन साखर आयुक्तालय येथील प्रादेशिक सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी यंदाच्या गळीत हंगामाचा परवाना रोखला आहे.