शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

‘वारणा मिनरल्स’चा भाडेकरार रद्द करणार

By admin | Updated: February 25, 2016 01:15 IST

उद्योग विभागाकडून अंतिम निर्णय घेतला जाणार

कोल्हापूर : येळवण जुगाई (ता. शाहूवाडी) येथील वारणा मिनरल्स कंपनीकडून खनिज उत्खननाचा भाडेकरार रद्द करण्याबाबत शासनाच्या उद्योग विभागाने सकारात्मकता दर्शविली आहे. वनविभागाने उर्वरित कागदपत्रे सादर केल्यानंतर उद्योग विभागाकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. हा निर्णय दि. २१ मार्चला उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीपूर्वी देणे बंधनकारक आहे. त्यामुळे काही तरी निर्णय हा घ्यावाच लागणार आहे. वारणा मिनरल्स खाण प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावण्या सुरू आहेत. पुढील सुनावणी दि. २१ मार्चला होणार आहे. तत्पूर्वी वन व उद्योग सचिवांनी एकत्रित बसून याबाबत निर्णय घेऊन तो सुनावणीवेळी सादर करावा, अशा सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी मंत्रालयात उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी वनविभागाचे सचिव विकास खारगे, कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी अभय भोगे आदी उपस्थित होते. वारणा मिनरल्स कंपनीला येळवण जुगाई येथे खनिज उत्खननासाठी शासनाच्या उद्योग विभागाकडून भाडेकरारानुसार परवानगी देण्यात आली आहे. त्यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यावेळी हा भाडेकरारच रद्द करणे तत्त्वत: मान्य असल्याचे उद्योग विभागाकडून सांगण्यात आल्याचे समजते. या विभागाची भूमिका ही भाडेकरार रद्द करण्याबाबत सकारात्मक असली तरी या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. यासाठी वनविभागाकडून आणखी कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. ती मिळाल्यानंतरच यावर उद्योग विभागाकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ही कागदपत्रे आज, गुरुवारीच वनविभागाकडून सादर केली जाणार असल्याचे समजते. यासंदर्भात आता पुन्हा बैठक होणार असून थेट निर्णयच होईल. हा निर्णय पुढील दि. २१ मार्चला उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवेळी देणे बंधनकारक राहणार आहे. तत्पूर्वी काही तरी निर्णय घ्यावाच लागणार आहे. (प्रतिनिधी)