शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ संचालकांचे पद रद्द करा

By admin | Updated: May 23, 2015 00:28 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक : राजू शेट्टी यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जयसिंगपूर : ज्या संचालकांवर वसुलीची जबाबदारी निश्चित झाली होती तेच संचालक जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत पुन्हा निवडून आले आहेत. बॅँकेतील ठेवींची संख्या कमी होत असून, बँक आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे, याची दखल घेऊन ज्या संचालकांवर वसुलीची जबाबदारी निश्चित ‘त्या’ संचालकांचे पद रद्द करावे, अशी मागणी खा. राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.जिल्हा बॅँक ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाते. सहकार विभागाने बॅँकेतील आर्थिक घोटाळ्यांमुळे सहकार अधिनियम ८८ खाली चौकशीनंतर यापूर्वीच्या संचालक मंडळावर वसुलीची जबाबदारी निश्चित करून बॅँकेवर प्रशासक नेमला होता. यापूर्वीच्या संचालक मंडळाने आपल्या निकटवर्तीयांना बेहिशेबी कर्जे देणे, मोक्याच्या जागा आर्थिक वाटाघाटी करून लिलावात काढणे, बॅँकेच्या फर्निचरमध्ये व इतर खरेदी-विक्रीमध्ये ढपला पाडणे, कागल शाखेतील २ कोटी शिलकीचा हिशेब न लागणे, २० गुंठे जमिनीवर ३२ लाख कर्ज देणे, अशा अनेक प्ररणातून जिल्हा बॅँक अडचणीत आली होती. बॅँकेच्या प्रशासकीय काळामध्ये बॅँकेमध्ये ठेवींचा ओघ वाढला होता. प्रशासकांनी बॅँक पूर्वपदावर आणली होती. परंतु नुकत्याच पंचवार्षिक निवडणुका झाल्या. निवडणूक जाहीर झाल्यावर एप्रिलमध्ये ठेवी २८८९ कोटी होत्या, आजअखेर या ठेवींचा आकडा ३८० कोटीने कमी झाला आहे. याचाच अर्थ ज्या संचालकांवर वसुलीची जबाबदारी निश्चित केली होती त्यांच्यावरील लोकांचा विश्वास कमी झाला आहे. (प्रतिनिधी)...तर बॅँकेला पुन्हा अडचणी येतीलतेच ते संचालक पुन्हा निवडून आल्याने त्यांच्यावरील विश्वास कमी झाला आहे. यामुळे बॅँकही आर्थिक अडचणीत येऊ शकते व आरबीआयच्या धोरणानुसार पुन्हा बॅँकेला अडचणी निर्माण होऊ शकतात. यासाठी जिल्हा बॅँकेमध्ये सहकार विभागाने ज्या संचालकांवर जबाबदारी निश्चित केली आहे व ते निवडून आले आहेत, त्या संचालकांना पदावरून कमी करण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष व खा. राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.