शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

तासिका कमी करण्याचा आदेश तत्काळ रद्द करा

By admin | Updated: May 4, 2017 23:15 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : कला, क्रीडा विषयांचे शिक्षक; शैक्षणिक व्यासपीठ उतरले रस्त्यावर

कोल्हापूर : ‘कला व शारीरिक शिक्षण व आरोग्य विषयांच्या शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘तासिका कमी करण्याचा अन्यायी आदेश रद्द करा’, अशा घोषणा देत कला, शारीरिक शिक्षण व आरोग्य विषयाचे शिक्षक गुरुवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.पुणे येथील विद्या प्राधिकरणच्या शिक्षण आयुक्त संचालकांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून कला, शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण विषयांच्या तासिका कमी करण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश रद्द करावा आणि तासिका पूर्वीप्रमाणे ठेवाव्यात, या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित केला होता. सकाळी पावणेअकरा वाजता दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मागण्या आणि सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत भर उन्हात मोर्चा पुढे सरकत होता. व्हीनस कॉर्नर, उद्योग भवनमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी रोखले. यावर आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी ठिय्या मारला. यानंतर येथे निषेध सभा झाली. तसेच आंदोलनकर्त्यांनी या आदेशाच्या परिपत्रकाची होळी केली. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले. आंदोलनात व्ही. जे. देशमुख, एस. बी. उमाटे, विनय पाटील, पी. के. पाटील, प्रभाकर आरडे, डी. एम. पाटील, ए. एस. निकम, सी. आर. गोडसे, राजाराम वरुटे, वसंत पाटील, आदींसह सुमारे एक हजार शिक्षक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)तासिकांतील बदल...२८ एप्रिल २०१७ च्या आदेशानुसार कला व शारीरिक शिक्षण या विषयांच्या तासिकांमध्ये कपात केल्याचे नमूद केले आहे. पहिली व दुसरीच्या वर्गासाठी दर आठवड्याला पूर्वी या विषयांसाठी पाच तास निश्चित होते. नव्या आदेशानुसार चार तास दिले आहेत. तिसरी ते पाचवीसाठी पाच तासांऐवजी तीन तास, सहावी ते आठवीसाठी चार तासांऐवजी दोन तास, तर नववी व दहावीसाठी तीन तासांऐवजी दोन तास दिले आहेत. आठवड्यात आठ तास कमी केल्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांवरही हा अन्याय आहे. नववीसाठी आरोग्य व कला रसस्वाद हे विषय अनिवार्य होते. मात्र, आता नव्या आदेशानुसार ते श्रेणीमध्ये वर्ग केल्यामुळे त्यांचे महत्त्व कमी झाले आहे. ंआदेश रद्द करण्याबाबत कोण, काय म्हणाले?एस. डी. लाड (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ) : कला, क्रीडा, आरोग्य शिक्षण या विषयांच्या तासिकांमध्ये कपात करण्याचा आदेश रद्द करावा. अन्यथा, जूनमध्ये शाळा सुरू होऊ देणार नाही. बी. एस. खामकर (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ ) : शालेय पातळीवर ‘खेळ’ या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन असेल, तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विचार करावा.खंडेराव जगदाळे (उपाध्यक्ष, राज्य कायम विनाअनुदान शाळा संघटना) : आपल्या शिक्षकबांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आता लढ्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सर्वांनी तयार राहावे.व्ही. जी. पोवार (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ) : कला, क्रीडा, आरोग्य विषयांच्या तासिका पूर्वीप्रमाणे कायम करून संबंधित शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सरकारने न्याय द्यावा.भरत रसाळे (राज्याध्यक्ष, राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती) : या शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठाने पुकारलेल्या लढ्यात सर्व शिक्षकांनी सहभागी होऊन ताकद द्यावी.दादा लाड (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा कला अध्यापक संघ) : या शिक्षकांवर सरकारकडून मोठा अन्याय होत आहे. तो दूर करण्यासाठी सर्वांनी संघटितपणे लढा देणे महत्त्वाचे आहे.आर. डी. पाटील (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना) : एकीकडे मुलांना क्रीडा क्षेत्रातील करिअरसाठी प्रोत्साहन द्या, असे सरकार म्हणते. आणि दुसरीकडे कला, क्रीडा, आरोग्य विषयांच्या तासिका कमी करते. सरकारची ही भूमिका विसंगत आहे.तासिकांतील बदल...२८ एप्रिल २०१७ च्या आदेशानुसार कला व शारीरिक शिक्षण या विषयांच्या तासिकांमध्ये कपात केल्याचे नमूद केले आहे. पहिली व दुसरीच्या वर्गासाठी दर आठवड्याला पूर्वी या विषयांसाठी पाच तास निश्चित होते. नव्या आदेशानुसार चार तास दिले आहेत. तिसरी ते पाचवीसाठी पाच तासांऐवजी तीन तास, सहावी ते आठवीसाठी चार तासांऐवजी दोन तास, तर नववी व दहावीसाठी तीन तासांऐवजी दोन तास दिले आहेत. आठवड्यात आठ तास कमी केल्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांवरही हा अन्याय आहे. नववीसाठी आरोग्य व कला रसस्वाद हे विषय अनिवार्य होते. मात्र, आता नव्या आदेशानुसार ते श्रेणीमध्ये वर्ग केल्यामुळे त्यांचे महत्त्व कमी झाले आहे.