शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शालिनी स्टुडिओचा रेखांकन आदेश रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:16 IST

कोल्हापूर : शालिनी सिनेटोनचा रेखांकन आदेश रद्द करा, शालिनी व जयप्रभा स्टुडिओची भूमी बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही, शालिनी ...

कोल्हापूर : शालिनी सिनेटोनचा रेखांकन आदेश रद्द करा, शालिनी व जयप्रभा स्टुडिओची भूमी बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही, शालिनी स्टुडिओ चित्रीकरणासाठी आरक्षित झालाच पाहिजे, अशा मागण्यांचे फलक हाती घेऊन गुरुवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळच्यावतीने खरी कॉर्नर कॅमेरा मानस्तंभ येथे मूक ठिय्या आंदोलन करण्यात आले. स्टुडिओचे प्राणपणाने जतन करण्याची सर्वांनी शपथ घेतली.

चित्रपट सृष्टीचे माहेरघर असलेल्या शालिनी व जयप्रभा स्टुडिओचे अस्तित्व कायद्याच्या, नियमांच्या पळवाटा काढून नामशेष करण्यात येत आहे. त्यातच आता शालिनी सिनेटोनच्या जागेवर बांधकामासाठी रेखांकन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याविरोधात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत गुरुवारी कॅमेरा मानस्तंभ येथे सर्व चित्रकर्मींनी कपाळाला काळ्या पट्ट्या बांधून मूक ठिय्या आंदोलन केले. शनिवारी बिंदू चौक येथे मेणबत्त्या लावून शासनाचा निषेध करण्यात येणार आहे.

या वेळी महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर म्हणाले, स्टुडिओ भोवतालच्या परिसरासह फक्त चित्रीकरणासाठीच उपयोग करावयाचा आहे. हेरिटेजमध्ये नोंद असतानाही शालिनी स्टुडिओची इमारत पाडली गेली, तर भविष्यात जयप्रभा स्टुडिओचीही हीच अवस्था होणार आहे. शासनाकडून शालिनी स्टुडिओच्या जागेवर रेखांकन करणेस मंजुरी दिली आहे. तो शासन निर्णय तातडीने रद्द करावा.

या आंदोलनास हिंदू एकता आंदोलन या संस्थेचे अध्यक्ष गजानन तोडकर व जिल्हाध्यक्ष संजय साडविलकर व त्यांचे पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला. या वेळी शरद चव्हाण, संचालक रणजित जाधव, अर्जुन नलवडे, सतीश बिडकर, अमर मोरे, अजय कुरणे, अरुण चोपदार, संग्राम भालकर, इम्तियाज बारगीर, राहुल राजशेखर, महादेव साळोखे, छाया डवरी, बबिता काकडे, रवींद्र बोरगावकर, नम्रता गोडबोले, ऐश्वर्या पाटील, अरुण पाटील यांच्यासह कलाकार, तंत्रज्ञ, कामगार उपस्थित होते.

--

फोटो नं ०१०७२०२१-कोल-चित्रपट महामंडळ

ओळ : कोल्हापुरातील कॅमेरा मानस्तंभ येथे गुरुवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने शालिनी व जयप्रभा स्टुडिओचे जतन व्हावे, या मागणीसाठी मूक ठिय्या आंदाेलन करण्यात आले.

---