शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळणार कालव्याचे पाणी

By admin | Updated: April 28, 2015 23:45 IST

अभियंत्यांचे आश्वासन : म्हाकवेसह सीमाभागाला दिलासा--लोकमतचा प्रभाव

म्हाकवे : काळम्मावाडी धरणाच्या निढोरी शाखेतून अंतर्गत उजव्या कालव्यातून सोडले जाणारे पाणी म्हाकवेसह हदनाळ, आप्पाचीवाडी आणि सीमाभागातील शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या शिष्टमंडळाला दिले. याबाबत ‘लोकमत’मधून सोमवारी (दि. २७) ‘म्हाकवेतील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून या प्रश्नाला वाचा फोडली होती.या कालव्यातून सोडले जाणारे पाणी म्हाकवेच्या २५ कि. मी. च्या पुढील आणि सीमाभागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. कालव्याची गळती, पोट कालव्याचे कमकुवत दरवाजे, सुरुवातीच्या गावातील शेतकऱ्यांचा आडमुठेपणा, कालव्यावर देखरेख करण्यासाठी अपुरे कर्मचारी, यामुळे हे पाणी म्हाकवेतील तसेच सीमाभागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही.याबाबत जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, कागल तालुकाप्रमुख अशोक पाटील, निवृत्ती पाटील, शामराव तिपे, शरद पाटील, आदींनी अभियंता पाटील यांची भेट घेऊन निवेदनही दिले. यावेळी पाटील यांनी शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी अडथळे दूर करण्याचे आश्वासन दिले. ‘लोकमत’चे आभारशेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा विषय असो, अथवा कालव्यामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचा विषय असो, ‘लोकमत’ने तो अत्यंत प्रभावीपणे मांडून त्याच्या यशस्वीतेपर्यंत पाठपुरावा केला जातो. याबाबत शेतकऱ्यांच्यावतीने शिवसेनेचे शाखाप्रमुख निवृत्ती पाटील यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.