शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

संगीत नाटकांना अनुदानाचाही लाभ घेता येईना..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:22 IST

इंदूमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्राला संगीत नाटकांची फार मोठी परंपरा आहे. काळानुसार संगीत नाटकांचे प्रयोग तुलनेने कमी होत असले तरी या नाटकांचा स्वतंत्र असा एक प्रेक्षकवर्ग आहे. संगीत नाटकांचे प्रयोग सादर व्हावेत यासाठी राज्य शासनातर्फे देण्यात येणारा निधी खर्चाच्या तुलनेत कमी असल्याने नाटकांचे मर्यादित प्रयोग सादर होतात. त्यामुळे ...

इंदूमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्राला संगीत नाटकांची फार मोठी परंपरा आहे. काळानुसार संगीत नाटकांचे प्रयोग तुलनेने कमी होत असले तरी या नाटकांचा स्वतंत्र असा एक प्रेक्षकवर्ग आहे. संगीत नाटकांचे प्रयोग सादर व्हावेत यासाठी राज्य शासनातर्फे देण्यात येणारा निधी खर्चाच्या तुलनेत कमी असल्याने नाटकांचे मर्यादित प्रयोग सादर होतात. त्यामुळे ‘अनुदान आहे पण लाभ घेता येईना’ अशीच या क्षेत्राची अवस्था झाली आहे.महाराष्ट्राला लाभलेल्या कलासंस्कृतीत संगीत नाटकांचे अमूल्य योगदान आहे. दीडशे वर्षांहून मोठी परंपरा असलेल्या संगीत नाटकांना राजर्षी शाहू महाराजांनी राजाश्रय दिला आणि ही कला राज्यभर रूजली. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या ‘किचकवध’ या नाटकातील दृश्यांचे किस्से आजही सांगितले जातात. बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसलेंपासूनची ही परंपरा अविरत प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिली. त्याकाळी नागरिकांना मनोरंजनाचे दुसरे साधन नव्हते. त्यामुळे नाटक हेच सामाजिक प्रबोधनाचेही माध्यम होते. गडकरींच्या ‘एकच प्याला’सारख्या सामाजिक संदेश देणाºया नाटकापासून ते ‘मत्सगंधा’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत संशयकल्लोळ’सारख्या विनोदी नाटकांपर्यंतचे विविध कलाकृती प्रेक्षकांनी अनुभवली. त्याकाळी ही नाटके रात्री आठ नऊ वाजता सुरू झाली की पहाटे तीन-चार वाजेपर्यंत चालत.आताचा प्रेक्षक एकाजागी एवढा वेळ बसू शकत नाही. त्यामुळे संगीत नाटके सहा तासांवरून अडीच तीन तासांवर आली. मात्र, गेल्या काही वर्षांत सर्वसामान्य प्रेक्षक संगीत नाटकांपासून दुरावला आणि समांतरलिखित पद्य नाटकांकडे ओढला गेला. त्यामुळे संगीत रंगभूमीची पीछेहाट झाली. मात्र, महाराष्ट्राला लाभलेली ही समृद्ध परंपरा जपण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला व एका संगीत नाटकाला २५ हजार रुपयांचे अनुदान सुरू केले. आता ही रक्कम ३० हजार रुपये झाली आहे. मात्र, अनुदानापेक्षा नाटकांच्या निर्मितीचा, सादरीकरणाचा, रंगमंचीय व्यवस्था, कलाकारांचे मानधन यांचे व्यस्त प्रमाण असल्याने संस्थांना अनुदानाचा लाभ घेता येत नाही, अशी स्थिती आहे. आताचा संगीत नाटकांचा प्रेक्षक मर्यादित आहे किंबहुना तो जुन्या पिढीतला आहे. त्यामुळे संस्थेच्या जोरावर नाटकाचा प्रयोग लावलाच तर किती प्रतिसाद मिळेल हे सांगता येत नाही. शहरांतर्गत प्रयोग लावणे अन्य शहरांत प्रयोग करण्यापेक्षा तुलनेने कमी खर्चिक असते.खर्च ५० हजारांच्या पुढे..संगीत नाटकांचा नेपथ्य. रंग-वेशभूषा हा वादक असा मोठा असतो त्यामुळे अन्य शहरांमध्ये प्रयोग करायचा म्हणजे प्रवासखर्च, कलाकारांच्या निवासाची जेवणाची सोय, नाट्यगृहाचे भाडे, नेपथ्य हे सगळे तीस हजारांत बसूच शकत नाही. हा खर्चच जातो ५० ते ६० हजारांपर्यंत त्यामुळे व्यावसायिक संस्थाही बाहेरगावी प्रयोग करण्यासाठी फारसे धजावत नाहीत.नवनिर्मिती आणि कलाकारांचा अभावसंगीत नाटके पौराणिक कथांवर आधारलेली असतात. या नाटकांच्या प्रत्येक अभिनेत्याने आणि अभिनेत्रीने गायन आणि अभिनय या दोन्ही पातळीवर सक्षमच असावे लागते. आताच्या पिढीत हा मेळ कमी प्रमाणात असतो. नवीन नाटकाला एकदा का राज्य नाट्यमध्ये यश मिळाले की नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येते त्यामुळे दर्जाच्या पातळीवर राज्य नाट्यमध्ये टिकणे हेच मोठे आव्हान असते. ते फारच कमी संस्था पेलू शकतात.शासनाने हे अनुदान जाहीर करताना काही अटी घातल्या आहेत. त्यात किमान पन्नास टक्के नाटके ही शहराबाहेर सादर झाली पाहिजेत, तिकीट दर मर्यादेपेक्षा जास्त असता कामा नये, खर्चाचा हिशेब ठेवणे, कागदोपत्री सादरीकरण अशा काहीशा किचकट बाबी असल्याने त्या निकषांत बसणेही संस्थांना अवघड जाते. त्यामुळे या नाटकांचे प्रयोग सादर होत नाहीत.- प्रफुल्ल महाजन (नाट्यवितरक)