शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

शाळाबाह्य बालकांच्या सर्वेक्षणासाठी मोहीम !

By admin | Updated: May 22, 2015 00:09 IST

महत्त्वाकांक्षी कार्यक्रम : ४ जुलैला शासनातर्फे राज्यभर व्यापक पाहणी

राम मगदूम- गडहिंग्लज --राज्यातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सर्व प्रकारच्या शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्याचा संकल्प राज्यशासनाने केला आहे. त्यासाठी ४ जुलै २०१५ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ यावेळेत शाळाबाह्य बालकांच्या शोधासाठी राज्यभर एकदिवसीय व्यापक सूक्ष्म सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे.२००९ च्या बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार ६ ते १४ वयोगटांतील प्रत्येक बालकास दर्जेदार शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आहे. तरीदेखील राज्यात मोठ्या प्रमाणावर शाळाबाह्य मुले आहेत. त्यामुळेच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.१०० घरांच्या सर्वेक्षणासाठी १ सर्वेक्षण अधिकारी, २० सर्वेक्षण अधिकाऱ्यांवर १ झोनल अधिकारी आणि २० झोनल अधिकाऱ्यांसाठी १ नियंत्रक अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. सार्वजनिक निवडणुका किंवा पल्स् पोलिओच्या धर्तीवर हे सर्वेक्षण अत्यंत काटेकोरपणे होईल. त्यानंतर आठवडाभरात या बालकांची आधारकार्ड नोंदणी केली जाईल.प्रत्येक गावात, नगरात घरोघरी, वाड्या-वस्त्या, झोपड्या, बसस्टँड, रेल्वेस्टेशन, बाजार, गुऱ्हाळघर, भटक्यांच्या पाली, पाडे, तांडे, दगडखाणी, मोठी बांधकामे, स्थलांतरित कुटुंबे, फुटपाथ, भीक मागणारी बालके, तमाशा कलावंतांची वस्ती, तेंदूपत्ता वेचणारे व विड्या वळणारे बालमजूर, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, शेतमळा आणि जंगलात वास्तव्य असणाऱ्या पालकांची मुले, मागासवर्गीय, वंचित व अल्पसंख्याक गटातील वस्ती आदी ठिकाणी हे सर्वेक्षण फिरून करण्यात येणार आहे. एक लोकचळवळ असणाऱ्या या उपक्रमात सरपंचापासून पं.स. व जि.प.सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षण सभापती यांच्यासह आमदार, खासदार यांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यासाठी व्यापक जनप्रबोधनही करण्यात येणार आहे.समित्यांची स्थापनायाकामी महानगरपालिकास्तरावर आयुक्त, जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, तालुकास्तरावर तहसीलदार व गावस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली सर्वसमावेशक समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे.विविध खात्यांचा सहभागराज्याच्या या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य, महिला व बालविकास, कामगार, आदिवासी व अल्पसंख्याक विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य आदी विभाग सहभागी होणार आहेत.सर्वेक्षणाची रूपरेषा२९ मे - शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक / निरंतर शिक्षण) व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची बैठक३ जून - जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक ८ जून - जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावरील अधिकारी व समित्यांच्या बैठका१५ जून - तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गावस्तरावरील समित्यांच्या बैठका२० जून - गावस्तरावरील बैठक, कार्यक्रमाचे नियोजन व प्रपत्र वाटप२५ जून - गावपातळीवरील उद्बोधन व कार्यक्रमाची प्रसिद्धी४ जुलै - प्रत्यक्ष सर्वेक्षणशाळाबाह्य मुलाची व्याख्या शाळाबाह्य मुले म्हणजे शाळेत न जाणारी बालके. ज्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही किंवा ज्याने प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नसेल असे ६ ते १४ वयोगटातील बालक असा असून यामध्ये एक महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने अनुपस्थित राहणाऱ्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होतो.