शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणप्रश्नी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:39 IST

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत ठराव करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन द्यावे, अन्यथा दि. ४ सप्टेंबरला मुंबईत धडक मोर्चा काढणारच, असा निर्धार बैठकीत करण्यात आला.‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे’ या मागणीसाठी दि. ४ सप्टेंबरला मुंबईत धडक मोर्चा काढण्याच्या नियोजनासाठी मंगळवार पेठेतील तालीम संस्था, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी सायंकाळी ...

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत ठराव करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन द्यावे, अन्यथा दि. ४ सप्टेंबरला मुंबईत धडक मोर्चा काढणारच, असा निर्धार बैठकीत करण्यात आला.‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे’ या मागणीसाठी दि. ४ सप्टेंबरला मुंबईत धडक मोर्चा काढण्याच्या नियोजनासाठी मंगळवार पेठेतील तालीम संस्था, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी सायंकाळी मंगळवार पेठेतील दत्ताजीराव काशीद सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी बाबासाहेब पाटील-लबेकर हे होते. यावेळी वसंतराव मुळीक, चंद्रकांत जाधव, संभाजीराव जगदाळे हेही प्रमुख उपस्थित होते.मुंबईला ४ सप्टेंबरला काढण्यात येणाºया मोर्चाच्या नियोजनासाठी समिती स्थापन करून त्यांनी नियोजनाचा रोज आढावा घ्यावा, या मोर्चात जास्तीत जास्त लोकसहभाग असावा, अशा सूचना उद्योगपती चंद्रकांत जाधव यांनी मांडल्या.वसंतराव मुळीक यांनी शासनाने धास्ती घेण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर जास्तीत जास्त संख्येने उतरावे, अशी सूचना केली. उद्या, बुधवारी मुंबईतील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षण प्रश्नासाठी राज्य शासनाने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याचे आश्वासन द्यावे, अन्यथा दि.४ सप्टेंबरला मोर्चा निघणारच, असा निर्धार केला.संभाजीराव जगदाळे, बाबासाहेब पोवार-लबेकर, मनोज शिंदे, दीपक गौड, माणिक मंडलिक, किशोर डवंग, राजू भोसले, संग्राम देवणे, किसन कल्याणकर, आदींनी सूचना मांडल्या. यावेळी राजू पाटील, रवींद्र मुळीक, किसनराव काशीद, रमेश माने, काका चरापले, रमेश मोरे, तालीम संस्था, मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांची उद्याभेट होण्याची शक्यतामराठा आरक्षणावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी जिल्ह्णातील सर्वपक्षीय खासदार-आमदार यांना तारीख व वेळ द्यावी, अशी विनंती खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यांनी तारीख व वेळ कळवितो, असे सांगितले आहे. त्यानुसार उद्या, बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी ही भेट होण्याची शक्यता आहे.