शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेची विशेष सभा बोलवा

By admin | Updated: January 22, 2016 00:53 IST

काँग्रेसची मागणी : नगराध्यक्षांना निवेदन सादर

इचलकरंजी : राष्ट्रीय फेरीवाला धोरण आणि त्याची नगरपालिकेने केलेली अंमलबजावणी या राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण विषयांबाबत नगरपालिकेची विशेष सभा बोलवावी, अशी मागणी कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी गुरुवारी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्याकडे केली.राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत तयार करण्यात आलेल्या स्थानिक समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपशी निगडित असलेल्या बहुतांश फेरीवाल्यांचे पुनर्वसन मूव्हेबल गाळ्यांमध्ये झाले आहे. या मूव्हेबल गाळ्यांबाबत कॉँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे. या विषयावर बुधवारी पालिकेतील मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कॉँग्रेसचे नगरसेवक व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली होती.तसेच नगरपालिकेने डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आणि जानेवारीच्या पहिल्या सप्ताहात शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमणांतर्गत असलेली अनेक खोकी, फेरीवाल्यांच्या गाड्या हटविल्या होत्या. स्टेशन रोडवरील डेक्कनजवळ असलेल्या फेरीवाल्यांच्या गाड्या हटविल्यानंतर त्याठिकाणी काही ठरावीक गाड्यांचे पुनर्वसन झाल्याचा आरोप कॉँग्रेसने केला आहे. म्हणून वरील आशयाच्या विषयाबरोबरच नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत केलेली कारवाई आणि डेक्कनजवळ असलेले अतिक्रमण अशा दोन विषयांबाबत कॉँग्रेसच्यावतीने नगराध्यक्षा बिरंजे यांना निवेदन दिले. या विशेष सभेला राजकीय वलय असल्यामुळे आणि सभा झाल्यास पालिकेत जोरदार शाब्दिक चकमक होण्याची शक्यता असल्याने नगराध्यक्षांकडून सभा केव्हा बोलावली जाते? याची उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)