कोल्हापूर : गॅस एजन्सी, रस्त्यांची दुरवस्था, कचरा उठावातील अनियमितता असो अथवा रखडलेली पेन्शन, अशा एक ना अनेक प्रश्नांबाबत शासकीय, खासगी कार्यालयांत वारंवार येरझाऱ्या, हेलपाटे मारूनदेखील न्याय मिळत नाही. ‘कॉमन मॅन’ला ते सहन होत नाही. त्याला त्याचा राग येतो; पण तक्रार नेमकी कोणाकडे करायची आणि केल्यास न्याय मिळेल का? याबाबत ते अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांची अडचण होते. ही अडचण दूर करण्यासाठी ‘लोकमत’ने गतवर्षीप्रमाणेच आताही हेल्पलाईनच्या माध्यमातून पाऊल टाकले आहे. त्यासाठी तुम्ही केवळ एक कॉल करायचा आणि तुमचा प्रश्न सांगायचा. संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पाठपुरावा तुमच्यातर्फे ‘लोकमत’ करणार आहे.कोणत्याही स्वरूपातील प्रश्न असू दे, त्यामध्ये सामाजिक हित असेल, कुणावर अन्याय होत असेल, तर त्याची दखल आवर्जून घेतली जाईल. एखाद्या संस्थेत काही चांगले घडत असेल, तर त्याचीही नोंद घेतली जाईल. कोणत्याही तक्रारी, अडचणी, गैरसोयी तुम्ही ‘लोकमत’ला कळवू शकता. त्यासाठी सकाळी ११ पासून सायंकाळी ६ पर्यंत तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. योग्य तक्रारींची दखल घेऊन त्यासंबंधी ‘लोकमत’कडून बातमीच्या स्वरूपात पाठपुरावा करण्यात येईल. तक्रारी सार्वजनिक हितास प्राधान्य देणाऱ्या असाव्यात. (प्रतिनिधी)संपर्कासाठी नंबर असे विश्वास पाटील : 9763725244 भारत चव्हाण : 9850384385संतोष पाटील : 9823085515संतोष मिठारी : 9922438388प्रवीण देसाई : 9860655056राजाराम लोंढे : 9421200244इंदुमती गणेश : 9881718930भीमगोंडा देसाई : 9421201579एकनाथ पाटील :9423802081गणेश शिंदे : 9403604587सचिन भोसले : 9860105851प्रदीप शिंदे : 9890772285संदीप खवळे : 9763642598छायाचित्रकारनसीर अत्तार : 9822477161आदित्य वेल्हाळ : 9922438381दीपक जाधव : 8421557157
कॉल करा, प्रश्न सांगा...
By admin | Updated: December 10, 2014 23:47 IST