शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘गडहिंग्लज’साठी पडेल ती किंमत मोजणार

By admin | Updated: March 19, 2016 00:27 IST

हसन मुश्रीफ : गडहिंग्लज कारखाना निवडणुकीसाठी शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारास प्रारंंभ

गडहिंग्लज : गडहिंग्लज साखर कारखाना लवकरात लवकर कर्जमुक्त करून शेतकऱ्यांच्या मालकीचा करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. त्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याची आपली तयारी आहे, अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिली.माद्याळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील श्री सोमलिंग मंदिरात शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. वेळेवर व चांगला ऊस मिळण्यासाठी दर्जेदार बियाणे आणि ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करा, असा सल्लाही मुश्रीफ यांनी दिला. मुश्रीफ म्हणाले, कारखान्याला ऊर्जितावस्था येण्यासाठी गाळप क्षमता वाढवून विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. संचालक मंडळाची तयारी असेल तर विस्तारीकरणाचा खर्च कंपनी करेल किंवा कंपनीचे पैसे भागविण्याची कारखान्याची तयारी असेल तर कंपनी परत जाईल.शिंदे म्हणाले, प्रत्येक सभासदाला कारखान्याची निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शिंदे नको म्हणणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीचा सभासदच समाचार घेतील.उदय जोशी म्हणाले, एका बाजूला तालुक्याच्या विकासासाठी ४० वर्षे झटलेली माणसं आणि दुसऱ्या बाजूला निवडणुकीपुरती येणारी मंडळी यापैकी योग्य पर्याय सभासद नक्कीच निवडतील.संग्रामसिंह नलवडे म्हणाले, भूतकाळापेक्षा वर्तमानकाळाबाबत चिंतन करून भविष्यासाठी ठोस काम करण्याची गरज आहे. कारखाना वाचविण्यासाठी शेतकरी आघाडी हाच एकमेव पर्याय आहे. बी. एन. पाटील यांचेही भाषण झाले.यावेळी सभापती मीना पाटील, नगराध्यक्ष राजेश बोरगावे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, युवराज पाटील, भैया माने, संतोष पाटील, रामाप्पा करिगार, बाळेश नाईक, बी. टी. पाटील, प्रा. स्वाती कोरी, शिवप्रसाद तेली, आदींसह राष्ट्रवादी व जनता दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते.महाबळेश्वर चौगुले यांनी प्रास्ताविक केले. सोमनाथ घेज्जी यांनी सूत्रसंचालन केले. राजेश पाटील यांनी उमेदवारांचा परिचय करून दिला. मनोज बोरगल्ली यांनी आभार मानले. यावेळी सभासद उपस्थित होते. (प्रतिनिधी)गैरव्यवस्थापनामुळे तोटा नव्हे!गडहिंग्लज कारखान्यातील तोटा गैरव्यवस्थापनामुळे नव्हे तर गाळप क्षमता वाढ, विस्तारीकरणाअभावी झाल्याचे ब्रीस्क् कंपनीच्या तीन वर्षांच्या अनुभवातून स्पष्ट झाले आहे. तीन वर्षांत कंपनीलाही १९ कोटींचा तोटा झाला असून, सुमारे ४० कोटींची कर्जे भागविली आहेत, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.