शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

हृदयाला बळकटी देणारा निवडुंग मृत्यूपंथाला

By admin | Updated: September 26, 2014 23:33 IST

जीवनदायीकडे डोळेझाक : संवर्धनाकडे सर्वांचेच होतेय कित्येक वर्षांपासून दुर्लक्ष

श्रीकांत चाळके - खेड -विज्ञानाने सर्वदूर शोध लावल्यानंतर काही वनस्पती आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. कडुनिंबासारख्या वनस्पती अनेक शारीरिक कमजोरीवर गुणकारी आहेत. मात्र, हृदय कमजोर झाल्यास त्याला बळकटी आणून धडधड बंद करणारा आणि आयुर्वेदाने ‘जीवनदायी’ संबोधलेला निवडुंग दुर्मीळ झाला आहे़ निवडुंगचे संवर्धन करण्यात शासन पातळीवर उदासीनता दिसून येत असल्याने बहुगुणी असलेला हा निवडुंग मृत्युपंथाला लागला आहे.सिमेंटच्या वाढलेल्या जंगलात रासायनिक फवारे मारलेले आणि पावडर टाकून अकाली कृत्रिम पक्व केलेली फळे खाण्याची वेळ आली आहे़ अशा काळात आयुर्वेदाने वाखाणलेली नागाची फणी आकाराचे अथवा पंचकोनी निवडुंग डोंगरदऱ्यातून भुईसपाट होत चालले आहे. हृदयाची दुर्बलता निवडुंगाच्या रसाने दूर होते, असे आयुर्वेदात म्हटले आहे. कोकणातील डोंगर दऱ्यामध्ये निवडुंग नजरेला पडत असत. येथील निवडुंगांना फळे येत नव्हती. या निवडुंगाचा कुंपणासाठी चांगला वापर होत असे. कोकणात बांधावर कुंपणातील दिसणारा निवडुंग तसेच दोन दशके कोकणात फळविरहीत आढळणारा निवडुंग आज दुर्मीळ झाला आहे.मराठवाडा विभागात डोंगर दऱ्यातून पूर्वी मुबलक प्रमाणात या फळरहीत निवडुंगाचे दर्शन होत होते़ याच निवडुंगाच्या फळांचा उपयोग शरीरातील धोकादायक आजारांवर होत आहे. अशा बहुगुणी आणि दीर्घकालीन उपयोगी असलेले हे निवडुंग नष्ट होऊ लागले आहे. बंंजारा समाज व आदिवासी लोक निवडुंगाची बोंडं आवडीने खातात, असे येथील भरणे व खेड परिसरातील आयुर्वेदाचार्य सांगतात.निवडुंग उष्ण कटिबंंध आणि ओसाड जंगलदऱ्यातून आढळते. डोंगरदऱ्यांतील शेतीला कुंपण म्हणूनही याचा वापर होतो़ पूर्वी आदिवासी लोक द्रोण, पत्रावळी तसेच विडी तयार करण्यासाठी पळसाची पाने तोडण्यासाठी जात असत तेव्हा निवडुंगाची पिकलेली फळे खावून ते या रानमेव्याचा आस्वाद घेत.निवडुंगाच्या रस सेवनाने भूक वाढते. कफ विकारावरही गुणकारी आहे. सतत होणारा मूत्र विकार तसेच दाह, हृदयविकारावर या फळाचां रस गुणकारी आहे, असे बहुउपयोगी असलेले निवडुंग आता दुर्मीळ होऊ लागल्याने काही पर्यावरणवाद्यांनीही चिंता व्यक्त केली आहे़ (प्रतिनिधी)असा आहे निवडुंग...निवडुंगात ४१ टक्के शर्करा, साडेसहा टक्के मांसजन्य घटक, ३० टक्के साखर असते व उर्वरित भाग चोथा असतो़ शिशिर ऋतूत झाडांना फळे येतात. फळापासून सरबत केले जाते तर काही ठिकाणी फळे भाजून खाल्ली जातात. कफ व दम्यासाठी हे गुणकारी आहे. आयुर्वेदाने जीवनदायी म्हणून उल्लेख केलेले हे निवडुंग आता मृत्युपंथाला लागले आहे़