शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बायपास नावाला... टोलची घाई कशाला!

By admin | Updated: April 1, 2016 01:27 IST

सांगली-कोल्हापूर मार्ग : तमदलगे-अंकली रस्त्यात अडथळे

जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या कामात सुप्रीम कन्स्ट्रक्शनकडून होत असलेली दिरंगाई त्यात टोल सुरू करण्याची घाई, त्यामुळे वाहनधारकांच्या नाकी दम आला असून, तमदलगे-अंकली बायपास रस्त्याची कामे अपूर्ण आहेत़ उदगाव येथील बायपास नवीन मार्गाची अवस्थादेखील तशीच आहे़ हा रस्ता कधी पूर्ण होणार, असा सवाल वाहनधारकांतून होत आहे़ महामार्गावरील तमदलगे ते जैनापूर मार्ग या बायपास रस्त्याचे काम सध्या अपूर्णच आहे़ रेल्वे स्थानक ते अंकली टोल नाक्यापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही़ या मार्गाला सध्याच्या रस्त्याला बाह्यवळण असल्याने हे बाह्यवळण दूर करून नवीन जागा हस्तांतर करण्यात आली आहे. तसेच उदगाव येथील ओढ्यावरील पूल बांधण्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे़ मात्र, या मार्गावरील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, फक्त मुरुमीकरणाचे काम पूर्ण झाले आहे़ चौपदरीकरणाच्या कामात तमदलगे ते अंकली तसेच तमदलगे ते जयसिंगपूर, उदगाव मार्गावरील अपूर्ण कामांमुळे या भागातील नागरिकांना एक प्रकारची शिक्षाच, अशी परिस्थिती असताना या भागातील नागरिकांवर अन्याय करणारा टोल नाका अंकली येथे होणार असल्यानेच त्याला विरोध होत आहे़ सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण रस्ता होण्यासाठी अनेक आंदोलने झाल्यानंतर या महामार्गाला मंजुरी मिळाली होती. पाच वर्षांपासून रस्त्याच्या कामाला विलंब झाला आहे़ टोलविरोधी कृती समितीने टोलला टोला देण्यासाठी चंग बांधला आहे. येणाऱ्या काळात टप्प्याटप्याने आंदोलन केले जाणार आहे. असून अडचण नसून खोळंबातमदलगे बसवान खिंडीपासून अंकली टोल नाक्यापर्यंत रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे़ निमशिरगाव-जैनापूर येथे सुमारे दीड किलोमीटर रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे़ तमदलगे येथे घरे व मंदिराचा प्रश्नही ‘जैसे-थे’ आहे़ यामुळे हा बायपास रस्ता ‘असून अडचण नसून खोळंबा’ असे असताना टोल कशासाठी द्यायचा, असा सवाल नागरिकांतून होत आहे़