शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीची ‘गुढी’ सोन्याहून पिवळी

By admin | Updated: April 9, 2016 01:01 IST

बाजारपेठ फुल्ल : वाहने, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीत १५ टक्क्यांपर्यंत वाढ

कोल्हापूर : सराफ व्यावसायिकांच्या बंदमुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा सोने खरेदीविनाच शुक्रवारी साजरा झाला. मात्र, दुचाकी-चारचाकी, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीला ग्राहकांनी गर्दी केल्याने बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल झाली. दरम्यान दारातील उंच गुढी, रंगीबेरंगी रांगोळी, तोरण, घरात पुरणपोळीचा बेत आणि कडुनिंबाद्वारे आरोग्यदायी जीवनाचा संदेश देणारा आणि उत्साहाचे प्रतीक असलेला गुढीपाडवा कोल्हापुरात धार्मिक वातावरणात उत्साहात साजरा झाला. सणानिमित्त करवीरनिवासिनी अंबाबाई देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली.गुढीपाडव्याला अधिकत्तर जणांचा सोने अथवा नव्या वस्तंूची खरेदी, नोंदणी करणाऱ्यावर भर असतो; मात्र सराफांचा बंद गुढीपाडव्या दिवशीही कायम राहिला. त्यामुळे सोने खरेदीचा पहिलाच मुहूर्त हुकल्याने ग्राहकांचा हिरमोड झाला. शिवाय अनेकांच्या पारंपरिक सोने खरेदीमध्ये यावर्षी खंड पडला. सराफ बाजारपेठ वगळता अन्य बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी होती. फ्लॅटची नोंदणी आणि जमिनीचे संचकार करण्याची काहींची धावपळ सुरू होती. दुचाकी-चारचाकीच्या शोरूम, टेंबे रोड, शिवाजी रोड, शाहूपुरी, राजारामपुरी, बिंदू चौक, सुभाषरोड, आदी परिसरातील फ्रीज, एलसीडी., एलईडी, ए.सी., कुलर, वॉशिंग मशीन, आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच मोबाईलच्या दुकानांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती. सायकल खरेदीसाठीही गर्दी दिसून आली. एक्स्चेंज आॅफर, हमखास भेटवस्तू, शून्य टक्केव्याजदराने कर्जपुरवठा, स्क्रॅच कुपन्स, डिस्काऊंट, आदी योजनांच्या वर्षावात बाजारपेठेत खरेदीचा उत्सव रंगला. काहीजण आपले नातेवाईक, मित्र-मैत्रिणींसमवेत आवडीची वस्तू खरेदीसाठी बाजारात फिरत होते. त्यामुळे दिवसभर बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलली होती. विविध स्वरूपातील खरेदीमुळे बाजारपेठेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लाखो रुपयांची उलाढाल झाली. (प्रतिनिधी)घराघरांत उत्साहाची गुढीहिंदू पंचांगानुसार नववर्षाचे स्वागत करणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त शुक्रवारी पहाटेपासूनच घरोघरी सणाची लगबग सुरूझाली. महिलांनी घरादाराची स्वच्छता करून सुरेख रांगोळी रेखाटली. पुरुषांनी गुढी उभारली. अधिकत्तर सुवासिनी महिलांनी पारंपरिक वेशभूषेत गुढीची पूजा केली. लहान मुलीही नऊवारी साड्या घालून मिरवत होत्या, तर मुले वडीलधाऱ्यांच्या कामात मदत करण्यासाठी धडपडत होती. दुसरीकडे पुरणपोळीसारख्या पक्वान्नांचा सुगंध दरवळत होता. तांब्याचा तांब्या, रेशमी वस्त्र, कडुनिंब व आंब्याचे डहाळे, चाफ्याच्या फुलांच्या व साखरेच्या माळा घालून प्रत्येकाच्या घरावर सजलेली गुढी जणू आकाशाला गवसणी घालत होती. त्यानंतर गुढीची पूजा, आरती करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. काहींनी इकोफ्रेंडली गुढी उभारली.बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक वस्तूंची जोरात उलाढाल झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्केवाढ झाली आहे. फ्रीज, ए.सी., कुलर, एलईडी., एलसीडी, आदींना ग्राहकांची अधिकतर मागणी होती.- नीलेश शहा, नॉव्हेल अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड