शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

अटी गुंडाळून ठेवून सोयाबीन खरेदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:33 IST

कोल्हापूर : सोयाबीन खरेदीसाठी अधिकाºयांनीच अटी घालून घेतल्याने गोंधळ उडाल्याचे सांगत अटी गुंडाळून ठेवून सोयाबीनची तत्काळ प्रतिक्विंटल ३०५० रुपये आधारभूत किमतीने खरेदी करण्याचे आदेश कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘नाफेड’ दिले. सोयाबीनमधील आर्द्रता १२ ऐवजी १४ टक्के असली तरी खरेदी करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.राज्यमंत्री खोत यांनी रविवारी ...

कोल्हापूर : सोयाबीन खरेदीसाठी अधिकाºयांनीच अटी घालून घेतल्याने गोंधळ उडाल्याचे सांगत अटी गुंडाळून ठेवून सोयाबीनची तत्काळ प्रतिक्विंटल ३०५० रुपये आधारभूत किमतीने खरेदी करण्याचे आदेश कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘नाफेड’ दिले. सोयाबीनमधील आर्द्रता १२ ऐवजी १४ टक्के असली तरी खरेदी करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.राज्यमंत्री खोत यांनी रविवारी शेती उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन खरेदी केंद्रास भेट देऊन आढावा घेतला. कोल्हापूर, वडगांव व गडहिंग्लज बाजार समितीमधील किमान आधारभूत खरेदी केंद्रावर १०४ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. एकूण उत्पादनाच्या तुलनेत फार कमी खरेदी असल्याचे राज्यमंत्री खोत यांच्या निदर्शनास आल्याने ते चांगलेच भडकले. दोन ठिकाणी सोयाबीनची तपासणी होत असल्याने शेतकºयांची कुचंबणा होत असल्याचे निदर्शनास आणून देत जिल्ह्यात यंदा काढणीवेळी पाऊस राहिल्याने सोयाबीन काळे पडले आहे, त्याचीही खरेदीची मागणी बाजार समितीचे उपसभापती अमित कांबळे यांनी केली. खरेदी केंद्र व वेअर हाऊस अशा दोन ठिकाणी सोयाबीनची तपासणी न करता केवळ खरेदीच्या ठिकाणी तपासणी करा. सात-बारावरील नोंद न पाहता शेतकरी असल्याचा दाखला, आधारकार्ड व बँक पासबुकाची झेरॉक्स पाहून खरेदी करा. अटी गुंडाळून ठेवा, सोयाबीनमध्ये घाण असेल तर त्याला चाळण द्या आणि खरेदी करा, असा आदेश खोत यांनी दिला. पहिल्यांदा चांगले सोयाबीनची खरेदी होऊ दे नंतर दुय्यम प्रतीचेही बघू, असेही त्यांनी सांगितले.जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, सदस्य परशुराम खुडे, नंदकुमार वळंजू, भगवान काटे, सचिव दिलीप राऊत, उपसचिव मोहन सालपे, मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापक मनोहर पाटील, आदी उपस्थित होते.मंडल अधिकारी दाखले देणारतलाठ्यांच्या संपामुळे शेतकºयांना दाखले मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्यमंत्री खोत यांनी तत्काळ जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तलाठी संपावर असले तरी केवळ शेतकरी असल्याचा दाखला मंडल अधिकाºयांनी द्यावा, तशा सूचना करण्यास त्यांनी सुभेदार यांना सांगितले.मी सांगतोय तोच अध्यादेश!सगळ्या अटी बाजूला ठेवून सोमवारपासून सोयाबीन खरेदी करा, कोणत्याही परिस्थितीत खरेदी वाढली पाहिजे. जो अधिकारी यामध्ये हयगय करेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. सुधारित अध्यादेशाची वाट पाहू नका; मी सांगतोय तोच अध्यादेश, अशा शब्दांत खोत यांनी अधिकाºयांना आदेश दिले.

टॅग्स :agricultureशेती