शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

एलईडी खरेदीत भ्रष्टाचार

By admin | Updated: June 29, 2016 00:05 IST

दिलीप टिपुगडे यांचा आरोप : करवीर पंचायत समिती सभा

कसबा बावडा : तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये एलईडी बल्ब खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, त्याला ग्रामसेवक जबाबदार आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी करावी, अशी मागणी दिलीप टिपुगडे यांनी करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत केली. अध्यक्षस्थानी सभापती स्मिता गवळी होत्या. सभेत पशुसंवर्धन, ग्रामपंचायत आणि शिक्षण विभागाला चांगलेच फैलावर घेण्यात आले.शासनाचे अनुदान आता थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा होत आहे. त्यामुळे आपल्या मर्जीनुसार ते वाटेल तशी खरेदी करत आहेत. रस्त्यावर लावावयाचे ३० वॅटचे एलईडी बल्ब काही ग्रामपंचायतींनी मात्र १८०० ते २००० रुपयांना खरेदी केले असतानाच काही ग्रामपंचायतींनी मात्र हेच बल्ब ५ हजार ६०० रुपयांना खरेदी केले आहेत. या प्रक्रियेत ग्रामसेवकांचा हात आहे. ४३ ग्रामपंचायतींमध्ये असा प्रकार घडल्याचे टिपुगडे यांनी सभागृहात सांगितले. त्यावर तानाजी आंग्रे, राजेंद्र सूर्यवंशी, यांनी कारवाईची मागणी केली. गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी महिन्यात या प्रकाराची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.‘ज्ञानरचनावादी अध्ययन’ व ‘आनंददायी एरोबिक्स’ या पंचायतच्या शिक्षण विभागाकडून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या ठरावाला सदस्यांनी संमती दिली. या उपक्रमाची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार व गटशिक्षण अधिकारी आर. जी. चौगले यांनी दिली. माध्यमिक शाळा समितीमध्ये कोणत्याही निर्णय प्रक्रियेत पंचायत सदस्यांना विचारात घेतले जात नसल्याची तक्रार भुजगोंडा पाटील यांनी केली. यावर माध्यमिकच्या शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी पंचायत सदस्य स्थानिक शाळेवर आपला अंकुश ठेवू शकतात, असा खुलासा केला. सचिन पाटील यांनी बाहेरील तालुक्यांतून आलेल्या; परंतु तक्रार असलेल्या शिक्षकांची नेमणूक करवीर तालुक्यात करू नये, अशी सूचना केली.जनावरांना गोकुळ दूध संघामार्फत लसीकरण कार्यक्रम राबवला जातो. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची औषधे खरेदी न करता अन्य इतर औषधे खरेदी करावीत, अशी मागणी सभागृहात केली.अपंगांसाठीचा तीन टक्के निधी ग्रामपंचायतींनी खर्च न केल्याचा आरोप तानाजी आंग्रे यांनी केला. घरकुल योजनेतून ९३ ठिकाणी घरे बांधली आहेत. परंतु, पहिले दोनच हप्ते लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. राहिलेला हप्ता त्यांना न देता त्यांची घरेच बेकायदेशीर असल्याच्या नोटिसा पाठविल्याची तक्रार सरदार मिसाळ व जयसिंग काशीद यांनी केली. याची चौकशी करण्याच्या सूचना उपसभापती दत्तात्रय मुळीक यांनी केल्या.करवीर पंचायत समितीच्या जागेसंदर्भात हालचाली सुरू असल्याची माहिती सभापती स्मिता गवळी यांनी सभागृहाला दिली. उपसभापती दत्तात्रय मुळीक यांनी या जागेवर कूळ म्हणून करवीर पंचायतचे नाव लागल्याचे सांगितले. या जागेसंदर्भात न्यायालयात दावा सुरू असल्याची माहिती दिली. दिलीप टिपुगडे यांनी सध्या आहे त्या ठिकाणी करवीर पंचायतची इमारत लगेचच होणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले.नंबर प्लेटवर महाराष्ट्र शासनगांधीनगरचे ग्रामसेवक वळवी यांच्या कारभाराची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी दिलीप टिपुगडे यांनी केली. वळवींनी नंबर प्लेटवर महाराष्ट्र शासन असे लिहिले आहे. त्यांना असे लिहिण्याचा अधिकार आहे का? असा सवालही टिपुगडे यांनी केला. नदीकाठच्या मोटार दुरुस्तीवर एक लाख रुपयांचा वळवींनी खर्च टाकला असल्याचे टिपुगडे म्हणाले.