शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘फुलपाखरू’, ‘म्युटेशन’ने जिंकली मने

By admin | Updated: February 2, 2015 00:03 IST

जयसिंगपूर राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा : दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी दर्जेदार एकांकिका सादर

जयसिंगपूर : आम्ही रसिक संस्थेच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा दुसरा दिवस दर्जेदार एकांकिकांनी गाजविला. राजेंद्र पोळ सांस्कृतिक प्रतिष्ठानने सादर केलेली ‘फुलपाखरू’ ही एकांकिका हृदयस्पर्शी ठरली. विष्णू सुर्या वाघ लिखित व देवीदास अमोणकर दिग्दर्शित ‘तुका अभंग अभंग’ या एकांकिकेने दुसऱ्या दिवशी स्पर्धेस प्रारंभ झाला. त्यानंतर पुणे येथील गंधाली संस्थेने ‘प्रारब्ध’ ही मुरलेंद्र शेटे लिखित व भालचंद्र करंदीकर दिग्दर्शित एकांकिका सादर केली. कोल्हापूरच्या शिंदे अकॅडमीने ‘तमसोमा ज्योर्तिगम्य’ ही एकांकिका सादर केली. आशय स्वरूपात ही एकांकिका सादर करण्याचा प्रयत्न झाला. कुडाळच्या सिद्धांत थिएटर्सने ‘क्लिक’ ही एकांकिका सादर केली. या एकांकिकेतील सर्वच कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट ठरला. कोल्हापूरच्या फिनिक्स क्रिएशन्सने सादर केलेले ‘बाप बीप बाप’ ही दोन पात्राची एकांकिका प्रभावी झाली. एकांकिका स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी मुंबई थिएटर्स आयोजित ‘सायलेंट स्क्रीम’ने प्रेक्षकांची मने जिंकली. ऋतुजा बागवे (मुक्ता) हिचा अभियन उत्कृष्ट झाला. तितकीच मोलाची साथ स्वप्निल हिंगडे (तो) ने दिला. सिद्धार्थ साळवींनी दिग्दर्शनात खूपच परिश्रम घेतल्याचे जाणवले. कोल्हापूरच्या प्रणव थिएटर्स यांनी ‘पी.एल.एस.आर.के.’ ही एकांकिका सादर केली. आशिष भोसले (पी. एल.) ने ग्रामीण ढंगातील मुलगा चांगला वठवला. लिव्ह इन रिलेशनशिप या चर्चेतल्या विषयावर सुंदर भाष्य करणारे सातारा येथील निर्मिती नाट्य समूहाने ‘म्युटेशन’ एकांकिका सादर केली. सोलापूरच्या अभिव्यक्ती थिएटर्सने ‘मृगजळ’ ही एकांकिका सादर केली. एकांकिकेतील वसुधा (अनुपमा खडे) व माधव (रणधीर अभ्यंकर) ही दोन्ही पात्रे विवाहित असून एकमेकांच्या पे्रमात पडतात आणि शेवटी सगळे मृगजळ असते.महाशाला कला संगम गोवा यांनी सादर केलेली एकांकिका ‘हिंदवी प्रपातो कोसवला’ एकांकिकेचे उत्कृष्ट सादरीकरण झाले आहे.नक्षत्र थिएटर्स सोलापूर यांनी ‘साठा उत्तराची कहाणी’ ही एकांकिका सादर केली. नानीला अर्धांगवायूचा झटका आल्याने त्या अंथरूणास खिळून आहेत. नाना आपल्या पत्नीची दिवसरात्र सेवा करतात. देहदानाचा फार्म भरण्यासाठी नानींना सांगतात, मात्र नानी नकार देते; परंतु मरण्यापूर्वी नानी फार्मवर सही करतात. (प्रतिनिधी)