शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

व्यापाऱ्यांनी लॉबिंग करून गुळाचे दर पाडले--

By admin | Updated: November 20, 2014 00:05 IST

गुळाला ग्रहण शेतकऱ्यांचे मरण

प्रकाश पाटील- कोपार्डे अवकाळी पावसाचे निमित्त पुढे करून व्यापाऱ्यांनी बाजार समितीत गुळाचा दर पाडण्याचा फंडा अवलंबला असून, आता शेतकऱ्यांच्या कमी प्रतीच्या गुळाला २६००, तर उच्च प्रतीच्या गुळाला ३२०० ते ३३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. गुळाला मिळणारा प्रति क्विंटल दर व त्याचा उत्पादन खर्च याचा मेळ घालताना शेतकऱ्यांच्या तोंडाला फेस येत आहे. एखाद्या शेतकऱ्यास दुसऱ्याच्या गुऱ्हाळात आपला ऊस गाळपासाठी द्यावयाचा झाल्यास गुऱ्हाळघरांचे एका रात्रीचे भाडे (चार आदणे) सध्या दहा हजार ते १२ हजारपर्यंत मोजावे लागतात. एवढेच नाही, तर यावर एक क्विंटल (१०० किलो) गूळही द्यावा लागतो. यानंतर तयार झालेला गूळ बाजार समितीमध्ये विक्रीसाठी पोहोचविण्यापासून तो विक्री होईपर्यंत प्रत्येक स्तरावर शेतकऱ्याची पिळवणूकच केली जाते. यात अडत कमिशन तीन टक्के, तोलाई, हमाली यांचा समावेश होतो.एवढेच नाही तर बाजार समितीत हा गूळ गेल्यानंतर जो सौदा काढण्याची पद्धत आहे ती अजबच आहे. एकाच क्षेत्रातील गाळप केलेल्या उसाच्या गुळातून वेगवेगळी कलमे काढली जातात. एवढेच नव्हे तर आदणात तयार झालेल्या गुळाची प्रत व्यापाऱ्यांच्या मर्जीने ठरविली जाते. काहीवेळा ही प्रतदेखील व्यापारी नव्हे, तर हमाल ठरवितात. ही चीड आणणारी प्रथा वर्षानुवर्षे चालू आहे.आजही व्यापाऱ्यांकडून बदली रवे काढण्याची प्रथा सुरू आहे. सौदे काढताना बाजार समितीत उतरलेल्या गुळाच्या थप्पीवरून पायातील चपलाही न काढता व्यापारी व हमालाकडून चालण्याचा प्रकार होतो. शेतकऱ्याने जिवापाड कष्ट करून पिकविलेल्या उसापासून तयार केलेल्या गुळाची चव ठरविण्याचा अधिकारच राहिलेला नाही. तो व्यापाऱ्यांकडूनच ठरविला जातो.या साऱ्याप्रकाराबरोबरच अवकाळीचे कारण पुढे करून गुळाचे दर पाडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांनी कारखान्यांना ऊस देण्यास पसंती दिली आहे. यातून गुऱ्हाळघरांवर संक्रांत येणार असून, हा कुटिरोद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे.एका आदणापासून किमान अडीच क्विंटल (२५० कि. ग्रॅ.) गूळ तयार होतो. तो तयार करण्यापासून विक्रीपर्यंतचा खर्च खालीलप्रमाणेअडीच टन ऊस (साखर कारखान्याच्या दराप्रमाणे प्रतिटन २५००)= ६२५० रुपयेगुऱ्हाळघराचे भाडे= २५०० रुपये२५ किलो गूळ (३० रुपयांप्रमाणे) = ७५० रुपयेबाजार समितीपर्यंत गूळ वाहतूक (एक क्विंटलला)= १०० रुपयेअडत= १८० रुपयेहमाली व तोलाई व इतर= ३० रुपयेपट्टी खर्च= ३० रुपयेअडीच क्विंटल उत्पादनासाठी एकूण खर्च = ९८४० रुपयेआम्ही आमचा ऊस गूळ उत्पादनासाठी वापरत होतो; मात्र गुळाचे दर व उत्पादन खर्च पाहिल्यास हा आतबट्ट्याचा धंदा झाला असून, ऊस साखर कारखान्यांना पाठविणेच सोयीचे वाटत आहे.- शिवाजी पाटील, शेतकरी, शिंदेवाडी, ता. करवीरमी माझा उच्च प्रतीचा गूळ उत्पादन करून बाजार समितीत गेलो. व्यापाऱ्यांनी एकी करीत गुळाला केवळ तीन हजारांपासून बोली लावायला सुरुवात केल्यानंतर माझ्या डोळ्यांत पाणी आले. खुर्चीसाठी मारामारी करणाऱ्यांनी प्रथम शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे.- बाजीराव देवाळकर,गूळ उत्पादक शेतकरी, कोपार्डे, ता. करवीरसध्या गुळाला सरासरी तीन हजार क्विंटल दर चालू आहे. याप्रमाणे अडीच क्विंटलला शेतकऱ्याला सात हजार ५०० रुपये हातात मिळत असून दोन हजार ३४० रुपये तोटा प्रती अडीच क्विंटलला होत आहे. बळिराजाला डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे.