शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकास गुढीपाडव्यापर्यंत महाराजांचे नाव द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST

:आमदार प्रकाश आवाडे लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील मध्यवर्ती बसस्थानकास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यास कोणाचीही अडचण ...

:आमदार प्रकाश आवाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील मध्यवर्ती बसस्थानकास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यास कोणाचीही अडचण नाही. त्यामुळे शासनाने याप्रश्नी गुढीपाडव्यापर्यंत निर्णय घ्यावा तसे न झाल्यास शिवप्रेमी मावळे त्याठिकाणी गुढी उभारतील, असा इशारा आमदार प्रकाश आवाडे यांनी दिला. तसेच मलाबादे चौकाचे नाव न बदलता छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली.

आमदार आवाडे म्हणाले, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. त्यामुळे बसस्थानकास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी प्रलंबित आहे. याबाबत आंदोलनही केले. याची दखल घेत मंत्र्यांनी याबाबत निर्णय घेण्याची ग्वाही दिली; पण त्याबाबत कोणताच निर्णय झाला नाही. तरी गुढीपाडव्यापूर्वी हा निर्णय व्हावा; अन्यथा त्यादिवशी शिवप्रेमी मिळून त्याठिकाणी गुढी उभारतील. तसेच के. एल. मलाबादे चौकाचे नाव न बदलता या चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारावा, ही मागणीसुद्धा प्रलंबित आहे. यासंदर्भात सर्वांनी एकजूट होऊन हे प्रश्न नेण्यास प्रयत्न करूया.

यावेळी माजी आमदार राजीव आवळे, पं. स. चे माजी सभापती महेश पाटील, राजू मगदूम, राकेश मगदूम, किरण माने, मिलिंद गवळी, रणजित शिंदे, अनिकेत कानुगडे, आदी उपस्थित होते.