शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

भरधाव बसची जीपला धडक

By admin | Updated: January 11, 2015 00:46 IST

शिवाजी विद्यापीठ चौकातील घटना : चार वर्षांच्या बालकासह नऊजण गंभीर जखमी

कोल्हापूर : शरदवाड (ता. कागल) येथे नातवाच्या बारशाला चाललेल्या जीपला भरधाव ट्रॅव्हल्स्ने शिवाजी विद्यापीठ चौकात जोराची धडक दिल्याने जीपमधील चार वर्षांच्या मुलासह नऊजण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. हा अपघात दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. मार्गावरील सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. जखमींची नावे अशी, सुशीला विठ्ठल पुजारी (वय ५०), सखुबाई कृष्णा पुजारी (४०), आंबुबाई शरद पुजारी (३५), बाळाबाई सुबाना रानगे (४०), सखुबाई नारायण धनगर (६०), आक्काताई सखाराम पुजारी (६०), नवसाबाई माळू पुजारी (४०), बाबासो विठ्ठल पुजारी (३२), राज काशिनाथ पुजारी (४, सर्व रा. वाशी, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. या अपघाताची माहिती समजताच वाशी व शरदवाड येथील नातेवाइकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. सुशीला पुजारी व सखुबाई पुजारी यांची प्रकृत्ती चिंताजनक बनल्याने त्यांना राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत पोलिसांनी सांगितले, वाशी येथील कृष्णात पुजारी यांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमासाठी भावकीतील महिला जीपमधून शरदवाडकडे निघाल्या होत्या. जीप बाबासो पुजारी हा चालवित होता. शिवाजी विद्यापीठ चौकात येताच निपाणीकडून कोल्हापूरकडे येणाऱ्या भरधाव खासगी ट्रॅव्हल्स्ने जीपला जोराची धडक दिली. यामध्ये जीपचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्यातील चार वर्षांच्या बालकासह महिला गंभीर जखमी झाल्या. डोक्याला, हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याने महिलांच्या आक्रोशाने परिसर हादरून गेला. विद्यापीठ परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी गर्दी केली. जखमींना जीपमधून बाहेर काढून मिळल त्या वाहनाने सीपीआरला पाठवून दिले. दरम्यान, अपघात होताचा ट्रॅव्हल्सचा चालक पसार झाला. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरूहोते. (प्रतिनिधी)