शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावात बसवाहकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:36 IST

बेळगाव : वायव्य कर्नाटक राज्य परिवहन विभागाच्या (केएसआरटीसी) दोन अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास दिल्याने बसवाहकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ...

बेळगाव : वायव्य कर्नाटक राज्य परिवहन विभागाच्या (केएसआरटीसी) दोन अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास दिल्याने बसवाहकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आनंद हरिजन (वय ५३, रा. केदनूर, बेळगाव) असे आत्महत्या करणाºयाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येला जबाबदार धरत दोन अधिकाऱ्यांना केएसआरटीसीने निलंबित केले आहे. सहाय्यक रहदारी नियंत्रण अधीक्षक एस. एम. मुल्ला आणि डेपो मॅनेजर एल. एस. लाठी अशी अधिकाºयांची नावे आहेत.याबाबची माहिती अशी, वरिष्ठ अधिकाºयांच्या जाचाला कंटाळून बेळगाव ‘केएसआरटीसी’च्या दुसºया बसडेपोत कार्यरत असलेल्या आनंद हरिजन या बस कंडक्टरने गळफास लावून घेत आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. आनंद यांनी सुसाईड नोटमध्ये ज्या अधिकाºयांनी त्रास दिला त्यांची नावे लिहून ठेवली होती. त्यामुळे जोपर्यंत त्या अधिकाºयांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही, असा पवित्रा नातेवाईक आणि समाज, संघटनांनी घेतला. याबाबत बसस्थानकावर संघटनेचे आंदोलन सुरू होते. हे आंदोलन सुरू असताना बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रविवारी सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत मृतदेह बसस्थानकात ठेवत नेत्यांनी आंदोलन केले.याप्रकरणी दुपारी एक वाजता सहाय्यक रहदारी नियंत्रण अधीक्षक एस. एम. मुल्ला आणि डेपो मॅनेजर एल. एस. लाठी या दोघा अधिकाºयांना निलंबित केल्यावर नातेवाईकानी आंदोलन मागे घेत मृतदेहावर अंत्यसंस्कार केला. याप्रकरणी मार्केट पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.