शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

तिरंग्याचा अपमान करणाऱ्याचा जाळला पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 19:59 IST

Farmer strike Kolhapur- दिल्लीत लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वजाचा अपमान करणाऱ्या दीप सिंधूसह देशद्रोहींचा कोल्हापुरात बुधवारी सायंकाळी पुतळा जाळून निषेध नोंदवला. सर्वपक्षीय कृती समितीने मिरजकर तिकटी येथे आक्रमक आंदोलन करुन धिक्काराच्या घोषणा दिल्या. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात तिरंगा ध्वज उतरवून दुसराच ध्वज फडकवला होता.

ठळक मुद्देतिरंग्याचा अपमान करणाऱ्याचा जाळला पुतळा कृती समितीचा पुढाकार : मिरजकर तिकटी येथे आंदोलन

कोल्हापूर : दिल्लीत लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वजाचा अपमान करणाऱ्या दीप सिंधूसह देशद्रोहींचा कोल्हापुरात बुधवारी सायंकाळी पुतळा जाळून निषेध नोंदवला. सर्वपक्षीय कृती समितीने मिरजकर तिकटी येथे आक्रमक आंदोलन करुन धिक्काराच्या घोषणा दिल्या.दिल्लीतील शेतकरी आंदोलनात तिरंगा ध्वज उतरवून दुसराच ध्वज फडकवला होता.

बुधवारी यावरुन आंदोलनात सहभागी असलेल्या दीप सिंधू याला संशयीत म्हणून ताब्यात घेतल्यानंतर दिवसभर सर्वत्र संतप्त पडसाद उमटले. राष्ट्रध्वजाचा अपमान कदापिही सहन करणार नाही, अशा देशद्रोह्यांना कठोरातील कठोर शिक्षा करा अशी मागणी करत सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मिरजकर तिकटीला क्रांती स्तंभासमोर जमले.

जोडे घातलेला देशद्रोह्यांचा प्रतिकात्मक पुतळाही तयार करुन आणला होता. देशद्रोह्यांचा निषेध आणि भारतमातेचा जयजयकार करत कार्यकर्त्यांनी पुतळ्याला आग लावली. आंदोलनात बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, संदीप घाटगे, प्रकाश घारगे, कुमार खोराटे, विजयसिह पाटील, राजू कुरणे, अर्जून नलवडे, प्रकाश डोंगळे, सुरेश टेलर, कुणाल भांदीगरे, सचिन देवकर, यासीन भालदार, अनिल झुरळे यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपkolhapurकोल्हापूर