शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

राजापुरात ‘बर्निंग’ टेम्पो

By admin | Updated: June 6, 2015 00:24 IST

साहित्याचे नुकसान : सावंतवाडीकडे जाताना अचानक पेट घेतला

राजापूर : मुंबईकडून संगमेश्वरकडे जाणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता घडली. सुदैवाने प्राणहानी टळली असून, राजापूर नगर परिषदेकडून पाण्याचे पंप मागवून आग आटोक्यात आणली गेली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प होती. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. टेम्पोत केमिकल असल्यामुळे आग लवकर पसरली.साबण बनवण्याचे केमिकल व जॉन्सन कंपनीच्या लहान मुलांच्या उत्पादनाची वाहतूक करणारा एक टेम्पो (जीए ०४ टी ०९५७) भिवंडीकडून सावंतवाडीकडे जात होता. हा टेम्पो अब्दुल असगावकर चालवत होते. सायंकाळी ४.३० दरम्यान विश्रामगृहाजवळील अवघड वळणावर आला असता टेम्पोने अचानक पेट घेतला व थोड्या वेळात संपूर्ण टेम्पोला आगीच्या ज्वाळांनी वेढले. ही घटना पाहून वरच्या पेठेतील नागरिक घटनास्थळी धावून आले व त्यांनी राजापूर पोलिसांशी संपर्क साधला.थोड्या वेळाने नगरपालिकेच्यावतीने दोन टँकर घटनास्थळी पाठवण्यात आले व जळत्या टेम्पोवर पाण्याचा मारा करण्यात आला. त्यामुळे आग आटोक्यात आली. या गाडीत निळ्या रंगाचे ड्रम खचाखच भरले होते. साबण बनवण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल व जॉन्सन कंपनीची उत्पादने त्यात होती. हे. कॉ. एन.व्ही. राडे, योगेश भाताडे, मनिष मिल्के, कदम तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. (प्रतिनिधी)